शहागडला अवैध विदेशी दारूसह हुंडाई कार पकडली१० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Beed

शहागडला अवैध विदेशी दारूसह हुंडाई कार पकडली१० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

शहागडचे दोन अंबडच्या एकाविरूध्द गुन्हा दाखलएपीआय रत्नदीप जोगदंडांनी लावला कारवाईचा धडाका

गेवराई/प्रतिनिधी 

शहागड ता. अंबड परिसरात अवैध देशी विदेशी दारू छुप्या मार्गाने विकत असल्याची चर्चा शहागडसह परिसरात होती. तर मंगळवारी सायंकाळी एक हुंडाई कारमध्ये अंबडहून शहागड (ता.अंबड) ला येत असल्याची माहिती गोपनीय शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, उपनिरीक्षक हनुमंत वारे, गोपनीय शाखेचे पो.काॅ महेश तोटे, पो.काॅ. नितीन खरात, जमादार भास्कर आहेर, अख्तर शेख, यांनी सापळा रचून पैठण फाटा येथे हुंडाई कार अडवून तपासणी केली असता, विदेशी दारूच्या १६८ बाटल्या हुंडाई कारमध्ये मिळून आल्या. आरोपींनी विना परवाना बेकायदेशीर प्रोव्हीबीशन गुन्ह्याचा माल मिळून आल्या प्रकरणी पोलिस काॅन्सटेबल नितीन खरात यांच्या फिर्यादीवरून ओव्हर फ्रेंड वाॅईन शाॅप मालक अंबड, राहूल बाबासाहेब भोसले, बालाजी बाबुराव नरके (रा.दोन्ही शहागड) तिघांविरुध्द गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहागड : अंबड येथून हुंडाई कारमध्ये आणलेल्या विना परवाना विदेशी दारूच्या जप्त माला सोबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड, उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार अख्तर शेख, गोपनीय शाखेचे पो.काॅ महेश तोटे, नितीन खरात आदी.

Sharing

Visitor Counter