नवजीवनचे आकाश नरसिंगे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर

नवजीवनचे आकाश नरसिंगे यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार जाहीर
बीड/प्रतिनिधी
आरोग्य , व्यसनमुक्ती , क्षेत्रात ऊल्लेखनिय कामगिरी बजावल्या बद्दल व्यसनमुक्ती परीषद महाराष्ट्र वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा सन्मान पुरस्कारा 2022साठी त्यांची निवड झाली आहे.
दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी विधान भवन सेंट्रल हॉल मुंबई येथे विधान सभा अध्यक्ष मा नरहरी झिरवाळ साहेब व सन्माननीय मंत्री महोदय व आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार त्यांना दिल्या जाणार आहे. आंबेजोगाई येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा डॉ. राजकुमार गवळे व प्रा.अंजलीताई पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आकाश नरसिंगे नवजीवन व्यसनमुक्ती क्लारंटाईन सेंटर मोरेवाडी येथे प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत . ते समाज कार्यात पदवी घेऊन समुपदेशक व सल्लागार म्हणून नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र मोरेवाडी कार्य करत आहेत.अंबाजोगाईत ग्रामीण भागात जनजागृती व समन्वय साधुन आरोग्य विषयक प्रबोधनाचे व व्यसनमुक्तीचे काम ते करत आहेत आंबेजोगाई येथील क्रांतिज्योत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र वाघाळा येथे शेकडो रुग्ण मित्रांना व कुटुबांना समुपदेशन करून सर्व उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या या कार्याची दखल व्यसनमुक्ती परिषदेने घेतली आहे ,त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डॉ. राजकुमार गवळे,प्रा.अंजलीताई पाटील, प्रा.आजिनाथ शेरकर ,वर्षाताई शेरकर यांच्या सह अनेकांना प्रत्यक्ष, फोनवरून, व्हाट्सएपच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
