केज नगराध्यक्षपदी आघाडीच्या सिताताई बनसोड तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शितलताई दांगट बिनविरोध

केज नगराध्यक्षपदी आघाडीच्या सिताताई बनसोड तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शितलताई दांगट बिनविरोध
केज/वार्ताहार
केज नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी जनविकास आघाडीच्या सिताताई बनसोड तर उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शितलताई दांगट यांची बिनविरोध निवड झाली या बाबतची माहिती की , केज नगर पंचायती मध्ये एकूण १७ सदस्यसंख्या आहे त्या पैकी जनविकास परिवर्तन आघाडीचे ८, काँग्रेसचे ३, राष्ट्रवादीचे ५ तर स्वाभिमानी पक्षाचा १ नगरसेवक आहे. जनविकास परिवर्तन आघाडी, काँग्रेस आणि स्वाभिमानी पक्ष यांनी निवडणुकी नंतर एकत्र येत सत्ता स्थापन केली. नगराध्यक्षपदी जनविकास परिवर्तन आघाडीच्या सिताताई बनसोड आणि उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या शितलताई दांगट यांची बिनविरोध निवड झाली.निवड होताच कार्यकर्त्यांनी नीळ, भंडारा गुलालाची उधळण करीत त्यांची उघड्या जीपमधून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, आदित्य पाटील, राहुल सोनवणे, बाळासाहेब ठोंबरे, हारून इनामदार, अंकुश इंगळे, सुरेश पाटील, रिपाइंचे दिपक कांबळे, पशुपतीनाथ दांगट, प्रविणकुमार शेप यांची उपस्थिती होती.
