छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथी लोकशाही पंधरवडा उत्साहात साजरा

Beed

छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालय आष्टी येथी लोकशाही पंधरवडा उत्साहात साजरा

आष्टी प्रतिनिधी

आष्टी येथील छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्याल यात दिनांक 26 जानेवारी 2022 ते 10 फेब्रुवारी 2022 या दरम्यान लोकशाही पंधरवडा म्हणून कृषी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग ,सांस्कृतिक कार्य विभाग, आणि विद्यार्थी समुपदेशन विभाग यांच्यामार्फत महाविद्यालयात विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला .या पंधरवड्यामध्ये लोकशाही ,मतदार नोंदणी, मतदानाचे महत्व या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले व विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून रांगोळी स्पर्धा, वाद विवाद ,स्पर्धा प्रश्नोत्तरे, स्पर्धा वेबविनार, गीत गायन, निबंध लेखन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस आर आरसुळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले कार्यक्रमाचे नियोजन प्रा. आय एम तांबोळी ,प्रा. साबळे एम व्ही , प्राध्यापिका कु. बनकर एस एल ,नवसरे जी जे यांनी केले

Sharing

Visitor Counter