गंगाई नगरात आनंद शैक्षणिक संकुल मध्ये शिव जयंती साजरी

गंगाई नगरात आनंद शैक्षणिक संकुल मध्ये शिव जयंती साजरी
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी येथील आनंद शैक्षणिक संकुल मध्ये कृषी महाविद्यालय, इंजिनिअरिंग कॉलेज ,बी फार्मसी कॉलेज , डी फार्मसी कॉलेज , महेश आयुवेर्दिक महाविद्यालय व रुग्णालय, नर्शिंग कॉलेज , अन्नतंत्र महाविद्याल, कृषी पदविका , महेश पॅरामेडीकल कॉलेज ,पशुसंवर्धन कॉलेज ,या सर्व महाविद्यालया मध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व रयतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या सर्व महाविद्यालया मध्ये प्रशासन अधिकारी डॉ. डी बी राऊत यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी आनंद शैक्षणिक संकुल मधिल कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ, डी फार्मसी ,बी फार्मसी व महेश पॅरामेडीकल कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुनिल कोल्हे, इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य संजय बोडखे, अन्न तंत्र कॉलेज चे प्राचार्य साईनाथ मोहळकर, महेश आयुवेर्दिक महाविद्यालय व रुग्णालय चे प्राचार्य डॉ चंद्रकांत गोसावी, कृषी तंत्र विद्यालय चे प्राचार्य घुले सर, नर्शिंग कॉलेज चे प्राचार्य सलमान खान यांच्या उपस्थितीत सर्व कॉलेज मध्ये शिव जयंती साजरी करण्यात आली