युवकांच्या साथीने विरोधकांचा धुरळा करू!

Beed

युवकांच्या साथीने विरोधकांचा धुरळा करू!

न.प.वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल-आ.संदीप क्षीरसागर

बबुभाई शेख,जीवन सुतार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

बीड/प्रतिनिधी

शहरातील शाहुनगर भागातील तरूण तडफदार बब्बुभाई शेख व हनुमान मंदिराजवळील जीवन सुतार यांनी आ.संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. येणार्‍या नगर पालिका निवडणुकीत युवकांच्या साथीने विरोधकांचा धुरळा केल्याशिवाय आणि नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे.

बीड शहरातील शाहुनगर भागातील तरूण तडपदार बब्बुभाई शेख व हनुमान मंदीराजवळील जीवन सुतार यांनी आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, जावेदभाई कुरेशी, वैजीनाथ तांदळे, अशोक रोमण, बरकत पठाण, रमेश चव्हाण, राजु महुवाले, भालेकर, कर्डुलेआबा, कुंदन काळे यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रवेश सोहळ्याने शाहुनगर भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद अधिक मजबुत झाली आहे. बीड शहरातील सुजान जनता या नगर पालिकेच्या निवडणूकीत बदल घडवेल हा विश्वास व्यक्त करत शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा आणि शहराचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही आ.संदीप भैय्या क्षीरसागर यांनी दिली. 

Sharing

Visitor Counter