तरुणांसाठी रोजगार मिळवून देणारा युवा नेता डॉ अजयदादा धोंडे

तरुणांसाठी रोजगार मिळवून देणारा युवा नेता डॉ अजयदादा धोंडे
आष्टी विधानसभा मतदार संघातील उच्चशिक्षित, विकासाचा वैचारिक वारसा, संस्कारक्षम,उदयन्मुख युवा नेता -डॉ अजयदादा धोंडे
आष्टी/प्रतिनिधी
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात किंबहूना अगदी लहान वयात आपल्या आई-वडील,आजी आजोबांचे शांत, शिस्त आणि जबाबदारीचं कर्तृत्व आणि नेतृत्व असलेले संस्कार...आपल्या जीवनभर घेत माणसातील माणुसकीचा मंत्र जपत परिसरातील गोरगरीब, दीनदलित, दुबळ्या,अपंग,ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांच्या मुलांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवताना.. सदैव आपले पिता आष्टी,पाटोदा ,शिरूरचे लोकप्रिय माजी आ.भीमराव धोंडे साहेब यांच्या समता स्वातंत्र्य , बंधुत्व आणि प्रगतीच्या संस्कारक्षम तालमीत वाढलेले युवा नेतृत्व आणि आष्टी,पाटोदा ,शिरूर तालुक्यातील तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या,अर्थात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस डॉ अजयदादा भीमराव धोंडे यांचे व्यक्तिमत्व आष्टी मतदारसंघातली युवकांना आकर्षित करीत आहे.
डॉ अजय भीमराव धोंडे..! आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार संघाचे गेल्या चार टर्म यशस्वी नेतृत्व करणारे विकासाभिमुख लोकप्रिय माजी आमदार भीमराव धोंडे साहेब यांचे चिरंजीव.अजयदादा धोंडे अगदी ११ वर्षी म्हणजे पाचवीत असल्यापासून आपले पिता धोंडेसाहेबांबरोबर विविध सभा-संमेलने आणि मार्गदर्शन सोहळ्यामध्ये त्यांचे नेतृत्वाचे गुण अवगत करत असत. विद्यालय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना धोंडेसाहेबांची गोरगरिबांना विषयीची असलेली तळमळ लक्षात घेऊन त्यांनी संघटन कौशल्य निर्माण केले.माजी आमदार धोंडे यांनी आष्टी, पाटोदा, शिरूरसारख्या अत्यंत ग्रामीण भागातील डोंगरदऱ्यातील शेतकरी कामगारांची मुलं शिकावीत.या अनुषंगाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शाळा महाविद्यालयांची स्थापना केली. सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन चांगला चालविला. बँक आणि इतर विविध क्षेत्रामध्ये पदार्पण करत गोरगरीबांना रोजगार दिला.कर्मवीर भाऊराव पाटलांच्या कार्याची प्रेरणा घेऊन नवीन प्रेरणादायी पहाट आणि विकासाची नवीन ज्योत निर्माण केली. हे दिव्य कार्य अजयदादा धोंडे अगदी जवळून पाहत होते... लोकनेते स्व गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचे विचार आणि कार्य तळागाळापर्यंत नेण्यासाठी आपले पिताश्री आदरणीय धोंडेसाहेब जीवाचे राम करतात याची जाणीव डॉ अजयदादा धोंडे या युवकाने सदैव ठेवली. गोरगरीब युवकांना सदैव मदत करणे, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, यासह शांत,संयमी, अभ्यासू आणि अत्यंत अष्टपैलू अशा प्रकारचा व्यक्तिमत्व असलेले अजयदादा तमाम युवकांचे गळ्यातील ताईत बनले आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम करताना बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे आदीसह राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्व आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली धोंडे परिवाराच्या माध्यमातून आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील शेकडो गाव, वाड्या, वस्त्या येथे विकासाची गंगा आणण्यात डॉ अजयदादा ची भूमिका आणि वाटा नक्कीच खारीचा तरी आहे.माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब यांनी शैक्षणिक संस्था,बँक,सहकारी साखर कारखाना तसेच कृषी क्षेत्रामध्ये शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतकरी कामगार युवक यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला, अंधश्रद्धा व अज्ञानातून बाहेर काढले. तसेच सुशिक्षित बेरोजगार यांना रोजगार उपलब्ध करून आणि व्यसनापासून दूर ठेवत कुटुंबवत्सल आणि संस्कारक्षम वाटचाल करण्याकडे सातत्याने मार्गदर्शन करत आहेत.कुठल्याच अवैद्य किंवा गुंडागर्दी या अत्यंत तुच्छ गोष्टींना वाव न देता अगदी संयम, शांत, शिस्त आणि योग्य मार्गाने आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील खेड्यापाड्यातील युवकांना योग्य दिशा देण्याचे काम अजयदादा धोंडे करत आहेत.धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले धोंडे परिवार भजन, प्रवचन, कीर्तन आदीसह धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असतात. महाराष्ट्रातील लाखो भक्तजनांचे दैवत असलेल्या संत वामनभाऊंच्या गडाचे भक्त असलेल्या या परिवाराने बाबांनी सांगितलेला समतेचा मंत्र नेहमीच प्रमाणिकपणे पाळला. डॉ अजयदादा धोंडे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्म पंथ यांना सोबत घेऊन समता बंधुत्व आणि राष्ट्रीय ऐक्य जोपासण्याचे कार्य ते करतात. अजय दादा हे सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना सातत्याने योग्य दिशा देण्याचे आणि उच्च शिक्षण घेऊन सुसंस्कृत होण्याचे सल्ले देतात. त्याने अनेकांना उच्च शिक्षणामध्ये आर्थिक मदत करून आपले कर्तव्य निभावले आहे.मार्च २०२० पासून राज्य आणि देशभरामध्ये कोवीड १९ तथा करुणा विषाणूने थैमान घातले आहे अशा परिस्थितीमध्ये एक नेतृत्व म्हणून धोंडे परिवाराच्यावतीने अजयदादांनी गोरगरीब शेतकरी शेतमजुरांना आर्थिक आधार दिला व देत आहेत. अनेकांना आधार व धीर दिला,मदत केली आणि आत्मविश्वासही दिला.राजकारणापेक्षा समाजकारण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर मराठवाड्यातील आष्टी,पाटोदा, शिरूरसारखे बीड जिल्ह्यातील मागासलेल्या तालुक्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचं मौल्यवान कार्य माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अजयदादा सातत्याने करत आहे. गत काही वर्षांमध्ये तिनी तालुक्यातील केलेले हजारो किमी चे डांबरीकरणाचे रस्ते कोट्यावधी रुपयाची केलेली कामे आजही सकारात्मक कौतुकास्पद विषय आहे. त्याचा अभिमान सबंध तिन्ही तालुक्यातील सर्व वर्गातील आणि सर्व जाती धर्म पंथातील युवक शेतकरी कामगार बांधवांना नक्कीच आहे.तमाम युवकांच्या गळ्यातील 'ताईत' बनलेल्या डॉ अजयदादा भीमराव धोंडे या युवा नेतृत्वाने येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक लढून आष्टी मतदारसंघात बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळवून देण्यासाठी युवा नेता डॉ अजयदादा धोंडे एक नवीन उदयन्मुख युवा नेतृत्वाचा आशादायी चेहरा असलेले अजयदादा यांच्या भविष्यातील यशस्वी प्रवासात सदैव 'जय' यावा.अजयदादांना खुपखुप शुभेच्छा...!
लोकप्रिय सक्षम नेतृत्वाचा जबाबदार वारस..!
आष्टी ,पाटोदा,शिरूर विधानसभा मतदार संघाचे तब्बल चार टर्म यशस्वी विकासाभिमुख सेवा माजी आमदार भीमराव धोंडेसाहेब यांनी पुर्ण केली. शिक्षण ,संस्कृती, राजकीय ,सामाजिक, धार्मिक, वैचारिक ,आर्थिक आदीसह विविध क्षेत्रात आपलं महत्तम योगदान देऊन धोंडे परिवाराने आपली जबाबदारी पूर्ण केली. धोंडेसाहेबांचा सक्षम वारसा त्यांचे सुपुत्र उच्चशिक्षित डॉ अजयदादा धोंडे निभावत आहेत. त्यांच्या विकासाचा वैचारिक वारसा एक जबाबदारीने ते निभावत आहेत. याचा आष्टी मतदारसंघातील तरुण,युवकांना अभिमान आहे.
