आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत पेठ बीड भागात 2 कोटी 30 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन

आ. विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत पेठ बीड भागात 2 कोटी 30 लक्ष रुपयांच्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
आ.विनायकराव मेटे यांच्या हस्ते आज पेठ बीड भागातील २ कोटी ३० लक्षांचे विवीध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण संपन्न होणार.
पेठ बीड भागात २ कोटी ३० लक्ष कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा
बीड/वार्ताहर
मा.आ.विनायकरावजी मेटे साहेब यांच्या प्रयत्नाने पेठ बीड भागातील २ कोटी ३० लक्षाचे विवीध विकास कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा आज राञौ ०८.०० वा. जी.एन.फंक्शन हॉल जवळ,मोमीनपुरा बीड येथे पार पडणार आहे.
बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही आ. विनायक मेटे यांनी प्रत्येक वेळी दिलेली आहे.बीड शहरातील रस्त्यांची दुरावस्था,सांडपाण्याचा निचरा ,तुंबलेली गटारे यासह असंख्य समस्येने बीड शहरातील नागरिक त्रस्त आहेत यातून त्यांना मुक्त करण्यासाठी आ. मेटे यांनी विकासाचा झेंडा हाती घेतला आहे.याचाच एक भाग म्हणून पेठ बीड भागात तब्बल 02 कोटी 30 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे.या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम आज रात्री 8.00 वाजता जी.एन फंक्शन हॉल जवळ मोमिनपुरा या ठिकाणी करण्यात येणार आहे.
बीड शहराच्या विकासासाठी शिवसंग्राम सातत्याने प्रयत्न करीत असून आ मेटे यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून शहरात विविध विकास कामांचा निधी उपलब्ध केला जात आहे.यामध्ये पेठ बीडमध्ये आ. मेटे यांनी चांगला निधी उपलब्ध करून दिला आहे.विविध विकास योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता नाली बांधकाम,विंधन विहीर व मोटार बसवणे तसेच पर्यटन विकास अंतर्गत शहेंशावली दर्गा,कन्कलेश्वर मंदिर यासाठी रु.02 कोटी 30 लक्ष रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला असुन या कामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास पेठ बीड मधील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसंग्रामच्या वतीने करण्यात येत आहे.
