के.प्रा.शा.आष्टी नंबर 1 शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

के.प्रा.शा.आष्टी नंबर 1 शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
आष्टी/प्रतिनिधी
सोमवार दि.28 फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषयावरील प्रयोगांचे सादरीकरण केले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पवार सर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अण्णासाहेब साबळे, केंद्रप्रमुख त्रींबक दिंडे उपस्थित होते.या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन पत्रकार अण्णासाहेब साबळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी श्रीकांत कारंडे यांनी विज्ञानातील अनेक गमतीजमती व सिद्धांत विद्यार्थ्यांना स्पष्ट केले.यावेळी आबा मरकड यांनी प्रत्यक्ष प्रयोगाच्या प्रात्यक्षिकासह आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली व विज्ञानातील अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार साबळे यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत विज्ञानाची आवड व चिकित्सक वृत्ती,आजपासून प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे असा सल्ला दिला.त्याच बरोबर आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रमांचे अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात येते याबद्दल सर्व शिक्षक वर्गांचे व विद्यार्थ्यांचे पालक व पत्रकार म्हणून अभिनंदन केले.विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सुरेश पवार यांनी विज्ञानाची गरज व प्रत्येक घटनेमागे व निसर्गातील घडामोडी मागे विज्ञानाचा संबंध आपण जोडून पाहिला पाहिजे,आणि चिकित्सक दृष्टीने विचार करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे गरजेचे आहे,याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.त्याच बरोबर मुले हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत आणि विद्यार्थ्यांना निसर्गातील निरीक्षण आणि त्यांच्या मनामधील असणाऱ्या शंका निरसन करण्यासाठी आपण समोर यायला पाहिजे व त्यांच्या निरीक्षण शक्तीला वाव दिला पाहिजे.उद्याचे भावी बालवैज्ञानिक आपण समोर बसलेले आहात आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा असे सांगून आयोजनाबद्दल सर्व बाल वैज्ञानिकांचे व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.यावेळी केंद्रप्रमुख त्रींबक दिंडे यांनी सर्व प्रयोगांची बाल वैज्ञानिकांकडून सर्व माहिती जाणून घेतली व सर्व विद्यार्थ्यांना बोलते केले.विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी व त्याचे विवेचन केल्याबद्दल सर्व बाल वैज्ञानिकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे केंद्रप्रमुख यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपक्रमशील शिक्षक बाळासाहेब तळेकर यांनी केले. यावेळी त्यांनी आपण विज्ञान शिकून चालणार नाही तर विज्ञान जगणे आवश्यक आहे व प्रत्येक घटनेतील वैज्ञानिक सत्य आपण जाणून घेतले पाहिजे,असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ज्योती गाडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास सुरेश पवार,नामदेव तावरे,तायराम गळगटे,धनंजय कुमठेकर,इला दंडवते,छबूबाई दहिफळे,शीला कातखडे, मायावती नावे,ज्योती गाडे,आबा मारकड,श्रीकांत कारंडे व पालक उपस्थित होते.
