दिवंगत हनुमंतराव उपरे काकांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहावे-पप्पू कागदे

दिवंगत हनुमंतराव उपरे काकांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना उपस्थित रहावे-पप्पू कागदे
बीड / प्रतिनिधी
ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानाचे प्रणेते स्मृतीशेष हनुमंतराव उपरे काका यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व गौरवग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा स्मृतिदिन समारंभ येत्या शनिवार दि. १९ मार्च रोजी सकाळी १० वाजता स्मृतिशेष हनुमंतराव उपरे काका स्मृतीस्थळ, घोसापुरी बीड येथे होणार आहे. तरी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, स्मृतीशेष हनुमंतराव उपरे काकांनी आपल्या हयातीत ओबीसींच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडुन विधायक आणि रचनात्मक कार्ये केले.महाराष्ट्रभर मंडलरथयात्रा, राज्यस्तरीय साहित्य संमेलन, पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यासंबंधीत आंदोलनाचे त्यांनी नेतृत्त्व केले. तसेच अनेक पुस्तकांचे सैद्धांतिक लेखनही त्यांनी केले आहे. यासोबतच ओबीसी बांधवांना संघटीत करून बौध्द धम्माची चळवळ गतिमान करण्यासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. काकांच्या निर्वाणानंतर त्यांचे मुलं सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष, संदिप उपरे व सत्यशोधक ओबीसी परिषदेचे सल्लागार संतोष उपरे हा धम्म रथ पुढे नेत आहेत.
या समारंभास भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, अध्यक्ष, प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षा भूमी, नागपूर,भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, भंते धम्मशील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच विशेष अतिथी म्हणून राजेंद्र पाल गौतम,कॅबीनेट मंत्री,समाजकल्याण,महिला तथा बालविकस,दिल्ली सरकार,विकास आयुक्त हर्षदिप कांबळे, न्या.सी.एल.थुल,माजी अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग,सेक्युलर मुव्हमेंटचे अध्यक्ष विचारवंत गौतमीपुत्र कांबळे,राजेश ढाबरे,नार्कोटिक्स कमिशनर,मुंबई,सुबच्यन राम,इन्कम टॅक्स कमिशनर, शिवानंद टाकसाळे ,मुख्य कार्यकारी अधिकारी,परभणी, तुषार ठोंबरे,अप्पर जिल्हाधिकारी,बीड, सुनील लांजेवार,अप्पर पोलीस अधिक्षक,बीड, संतोष वाळके,पोलीस उप अधिक्षक,बीड. प्रमुख उपस्थिती तरी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.
