भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बीडचा फेवरेट कवी पुरस्कार बारकु आघाव यांना

Beed

भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच आयोजित बीडचा फेवरेट कवी पुरस्कार बारकु आघाव यांना

बीड/प्रतिनिधी

नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असणा-या भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी कडे नवोदित लेखकांचा ओढा वाढत आहे. ही संस्था नेहमीच नवोदित लेखकांकरीता वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, मार्गदर्शन शिबीरे आयोजित करत असते. याच गोष्टींची दखल घेत नवोदित लेखक वर्ग भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी ला पसंती दर्शवत आहे. हीच बाब लक्षात घेता संस्थेच्या वतीने तळागाळातील नवोदित लेखकांना या प्रवाहात सामील करून घेण्याकरीता संस्थेच्या माध्यमातून बीडचा फेवरेट कवी ही स्पर्धा राबविण्यात आली. बीडचा फेवरेट कवी या स्पर्धेत विजेता होण्याचा मान बारकु आघाव यांना मिळाला तर अंकुश नागरगोजे हे उपविजेते ठरले. 

    बारकु आघाव हे गेली 15 वर्ष साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांना ग्रामीण कवी म्हणून ओळखले जाते, तर अंकुश नागरगोजे हे ही एक उत्कृष्ट लेखक आहेत, याचबरोबर राजश्री मिसाळ, राऊत वैष्णवी, मिरा खेडकर, सविता ढाकणे, शिल्पा वाघमारे विजयकुमार पांचाळ आदी कवी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाच्या माध्यमातून अनेक नवोदित साहित्यिकांना, कलाकारांना त्यांची कला जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे असे संस्थेचे अध्यक्ष विशाल सिरसट व उपाध्यक्ष विजय जायभाये यांनी सांगितले, यावेळी आम्रपाली घाडगे, शिल्पा मुसळे, सिध्दार्थ आंबेकर, ऋतुजा मिसळे यांनी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

Sharing

Visitor Counter