महावितरणच्या तारा मधील घर्षणामुळे कुर्ला येथील पाटील यांच्या शेतातील अडीच एकर ऊस जळून खाक
Beed

महावितरणच्या तारा मधील घर्षणामुळे कुर्ला येथील पाटील यांच्या शेतातील अडीच एकर ऊस जळून खाक
बीड/वार्ताहर
बीड तालुक्यातील कुर्ला येथे वास्तवाच असणारे गणेश महादेव पाटील यांच्या शेतामध्ये गुरुवारी सायंकाळी विद्युत तारांच्या घर्षणामुळे उसाच्या शेताला भीषण आग लागली. आगीमध्ये पाटील यांच्या अडीच एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे. बीड तहसील प्रशासनामधील अधिकाऱ्यांनी या शेताची पाहणी करून पंचनामा करावा व महावितरण कडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शेतकरी पाटील यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे.
