अ.भा. वारकरी मंडळाच्या  संत संमेलन राज्य उपाध्यक्षपदी निवड

Beed

अ.भा. वारकरी मंडळाच्या  संत संमेलन राज्य उपाध्यक्षपदी निवड

श्री वैद्यनाथ भजनी मंडळाच्या वतीने ह.  भ. प. रामेश्वर महाराज कोकाटे यांचा वैद्यनाथ मंदिर येथे सत्कार

परळी वैजनाथ /प्रतिनिधी

अ.भा. वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य  संत संमेलनाच्या राज्य  उपाध्यक्ष पदी ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोमवार दिनांक 4 एप्रिल रोजी श्री वैद्यनाथ भजनी मंडळ यांच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात शाल श्रीफळ पुष्पहार व प्रभू वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले प्रभू श्री वैजनाथ मंदिर येथे सोमवार दिनांक 4 एप्रिल रोजी मंदिर येथे  छबीना  झालेल्या कार्यक्रमात परळी येथील श्री वैद्यनाथ भजनी मंडळ यांच्या वतीने अ.भा वारकरी मंडळ संत संमेलनाच्या राज्य  उपाध्यक्षपदी ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांची नियुक्ती झाल्याचे समजताच त्यांचा शाल फेटा श्रीफळ पुष्पहार व प्रभू वैद्यनाथाचे प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री कोकाटे यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेऊन पूजा केली. उपस्थित श्री वैद्यनाथ भजनी मंडळातील महिला व पुरुषांना संबोधित करताना श्री कोकाटे म्हणाले की आज प्रभू वैद्यनाथाचे मंदिरात वैद्यनाथ भजनी मंडळाला केलेला माझा सन्मान माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असून वारकरी मंडळाची भगवी पताका सदैव फडकत ठेवणार असून वारकरी मंडळातील सर्व महिला पुरुषांचे प्रश्न शासन दरबारी आणि आपण प्राधान्याने सोडविणार असल्याचे ह भ प रामेश्वर महाराज कोकाटे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित सर्व महिला व पुरुष भजनी मंडळांनी प्रभू वैद्यनाथाचे भजने सादर केली.

यावेळी   वैद्यनाथ भजनी मंडळाचे अध्यक्ष दयानंद चौधरी, लक्ष्मणअप्पा बुद्रे, शिवराज बोटुळे, शिवाप्पा गौरशेट्टे, मन्मथअप्पा ओपळे, रवि बुरकुले, अमोल वाकडे, विश्वांभर साखरे, रामकिशन साखरे, मन्मथअप्पा वारद, सुरेश शिंदे, गंगाधर वेरूळे, बापुराव यादव, सुभाषराव शेटे, नागनाथ वाघमारे, मलिकार्जुन घनचक्कर, भास्करराव कोटुळे, ऋषिकेश बिडकर, शिवलिंग कोदरे, झाडे सर, बालाजी सेलुकर, संदिप हालगे, वामनराव सावजी, भास्करराव ज्ञानेश्वर कुलथे, भाले, नाईकवाडे, साबळे, महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गोदावरीताई चौधरी, अन्नपुर्णाताई निर्मळे, अ.भा.वा. मंडळाच्या परळी तालुका महिला संपर्क प्रमुख चेतनाताई गौरशेट्टे, वनीता चौधरी, मंगल गुळवे, राधाताई कोदरे, सुभाताई कुलथे, महादेवी चौधरी, निर्मला पुरस्कर, शैलजा स्वामी, प्रणिता महाजन, दैवशाला गौरशेटे, शिवकन्या निर्मळे, अनुराधा बुधे, निर्मला वारद, इंदुताई फुटके, कमल घेवारे, सुलोचना हत्ते, ललीता वेरूळे, मैना व्यवहारे, सुनिता रोडे, छाया चौधरी, शिवकन्या स्वामी, ज्योती बुद्रे, प्रेमला सावजी, जठार, दुर्गा हरंगुळे यांच्यासह  शेकडो महिला पुरुष तसेच परळी व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Sharing

Visitor Counter