धक्कादायक: औरंगाबाद: जिल्ह्यात एकाच दिवशी पाच कोरोनाबधितांचा बळी
Beed

धक्कादायक: औरंगाबाद: जिल्ह्यात एकाच दिवशी पाच कोरोनाबधितांचा बळी
बळींचा आकडा 55 वर
औरंगाबाद प्रतिनिधी /सिद्धांत कांबळे
कटकट गेट येथील 55 वर्षे महिला रुग्णांचा 25 मे रोजी रात्री 1:30 वाजता,
गारखेडा येथील
48 वर्षे पुरुष रुग्णांचा 25 मे रोजी रात्री 12:30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.. तर आज 25 मे रोजी मध्यरात्री तीन वाजता रोहिदास नगर, मुकुंदवाडी येथे 35 वर्षीय महिलेचा, कैलासनगर 75 वर्ष महिलेचा पहाटे 3:15 वाजता आणि सिल्लोड येथील अब्दुल शहा नगर येथील 55 वर्षीय महिला रुग्णांचा सकाळी 6:30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या मृत रुग्णांमध्ये एक पुरुष आणि चार महिला रुग्णांचा समावेश आहे.. घाटी प आतापर्यंत 50 कोरनाबधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात 70 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू असल्याचे ही प्रशासनाने कळविले आहे








