राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षातर्फे विरोध

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षातर्फे विरोध
बीड/वृत्तसंस्था
महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे सभा घेण्याचे ठरविले आहे . या सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ ( इंडिया खरात ) पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनाव्दारे केली आहे . राज ठाकरे हे सामाजिक वक्तव्याच्या नावाखाली धार्मिक वक्तव्य करत आहेत . त्यामुळे सामाजिक ऐक्य बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे . सामाजिक तेढ निर्माण होऊ नये , मनसेच्या सभेला परवानगी देवू नये , अशा आशयाचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( खरात ) पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना दिले . निवेदनावर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे , मनोज शेजवळ , आदित्य वाहुळ , योगेश उबाळे , संतोष सूर्यवंशी , नितेश तांगडे , करण ठोंबरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .