बीड शहरातील जुन्या व जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा - आयशा शेख

Beed

बीड शहरातील जुन्या व जीर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा - आयशा शेख

बीड/प्रतिनिधी

दि.09. काल बीड शहरातील एस पी ऑफीस समोरील भागात काल तीन मजली इमारत पात्यासारखी कोसळली लाखो रुपयांचे नुकसान, दुर्दैवी घटनेचा बोध घेणे गरजेचे, या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही, या गोष्टीचा धडा घेत नगर परिषद बीड प्रशासनाने पावसाळा सुरू होण्याच्या आधी तात्काळ बीड शहरातील जीर्ण इमारती चा शोध घेऊन त्यांचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये बसतात का हे पाहून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बीड येथील दैनिक सूर्योदयाच्या उपसंपादक तथा समाजसेविका आयशा रफीक शेख यांनी मागणी केली आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस येऊन घातले आहेत यामुळे बीड शहरातील जुन्या गाव भागातील तसेच इतर ठिकाणच्या जीर्ण व जुन्या इमारतीचे नगरपालिकेने तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे जेणेकरून जुन्या गाव भागातील बीड शहरातील इमारती दुरुस्त होतील किंवा त्या खाली केले जातील यामुळे कसली जीवित हानी होणार नाही यासाठी बीड नगर परिषदेने पुढाकार घ्यावा काल जो बीड शहरात प्रकार घडला त्याची पण दखल घेतली पाहिजे व त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे असं मत समाजसेविका तथा पत्रकार अशा शेख यांनी केले आहे, स्ट्रक्चरल घराचे ऑडिट हे फक्त मुंबई-पुण्यासारख्या शहरातच केले जाते बीड शहर सारख्या छोट्याशा शहरात हे देखील करणे काळाची गरज आहे असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे, बीड शहरात विनापरवाना बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याचीही चौकशी झाली पाहिजे परंतु जी बांधकामे झाली आहेत व जुनी आहेत त्याची पण इत्यंभूत चौकशी होणे गरजेचे आहे यासाठी नगरपरिषदा पुढाकार आवश्यक आहे असं मत त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी धरले आहे.

Sharing

Visitor Counter