चार दिवसानंतर बँक उघडूनही गर्दी आवाक्यात धारूर शहरात प्रशासनाचे चोख नियोजन जिल्हाधिकारी रेखावार यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन

Dharur

धारूर/इरफान शेख
धारूर शहरात आज प्रशासनाने चोख नियोजन केल्याचे दिसून आले बुधवारी खूपच गर्दी झाली होती प्रसार माध्यमातून याबाबत बातम्या ही प्रसिद्ध झाल्या होत्या यामुळे आज प्रशासन आलर्ट्ट झाल्याचे दिसून आले

जागोजागी सोशल डीसटन्स ठेवण्यात आले होते जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन करत प्रशासनाने चोख नियोजन केले होते

पेट्रोल पंप चालक , बँक यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने चौकोन आखून सुरक्षित आंतर ठेवल्याचे दिसून आले नगरपरिषदेने रात्रीच जगोजागी रस्ता आडवून अडथळे निर्माण केले आहेत त्यामुळे वाहतूक झाली नाही व गर्दी आवाक्यात आली पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला होता यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी सुहास हजारे, पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांच्यासह संपूर्ण प्रशासन टीमचे सतर्क असल्याचे दिसून येत आहे.

Sharing

Visitor Counter