ब्रिज प्रायमरी स्कूलचे आज उद्घाटन

Beed

ब्रिज प्रायमरी स्कूलचे आज उद्घाटन

बीड/प्रतिनिधी

निलावती सेवाभावी संस्था संचलित ब्रिज प्रायमरी इंग्लिश स्कूलचे उद्घाटन शिवसेना नेते तथा नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते रविवार (दि.12) जून रोजी सकाळी १० वाजता बाळराजे नगर पालवन रोड बीड, येथे करण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेचे संस्थापक सचिव डॉ. नंदकुमार उघाडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी जिल्हा परिषद बीड चे सुभाष साळवे असतील. तसेच या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नेते उत्तमराव पवार, नगरसेवक गणेश दादा वाघमारे,नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक विकास जोगदंड, नगरसेवक रवींद्र कदम, नगरसेवक विनोद मुळूक, नगरसेवक रंजित बनसोडे, नगरसेवक भैय्या मोरे, उपशिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे, स्वाभिमानी मुफ्टा संघटनेचे जिल्हा महासचिव प्राध्यापक विक्रम धनवे, डॉ. अशोक गायकवाड , मनिषाताई तोकले इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सर्व नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन डॉ. नंदकुमार उघाडे यांनी केले आहे.

 

Sharing

Visitor Counter