बीडमध्ये सहजयोगच्या वतीने गुरूपुजन सोहळ्याचे आयोजन

Beed

बीडमध्ये सहजयोगच्या वतीने गुरूपुजन सोहळ्याचे आयोजन

बीड/प्रतिनिधी

प.पू.श्री माताजी निर्मलादेवी यांच्या परमकृपेत व कृपा आशिर्वादात जिल्ह्या स्तरीय श्री आदिगुरू पूजा रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी बीड येथे आयोजित केली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व सहजयोगी ताई-दादांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून परमचैतन्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा सहजयोग कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

प.पू.श्री माताजी निर्मलादेवी यांच्या परमकृपेत व कृपा आशिर्वादात जिल्ह्यास्तरीय श्री आदिगुरू पूजा रविवार दि.१७ जुलै २०२२ रोजी साई पंढरी लॉन्स मंगल कार्यालय, अंकुशनगर, जुना चर्‍हाटा रोड बीड येथे करण्यात आले असून पुजा सकाळी १० वाजता होणार आहे. आपली भारतीय संस्कृती ही समृद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीला अनेक महान गुरु लाभले आहे. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आद्यगुरू प.पु.आदिशक्ती निर्मला माताजी या जगाला लाभल्या. त्यांनी कुंडलिनी,सहस्त्रारच्या माध्यमातून परमचैतन्याची जाणिव व्यक्तीला कशाप्रकारे होऊ शकते आणि थेट नाते परमेश्‍वराशी कसे जोडले जाते याचे व्दार खोलून दिले आहे. ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा, गुरू म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य, गुरू म्हणजे निस्सीम श्रध्दा आत्रण भक्ती, गुरू म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक, आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणार्‍या गुरूंचा आज सोहळा होत आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ताई-दादांनी या आदिगुरू पुजन सोहळ्यात सहभागी होऊन सर्व सामुहिकता परम चैतन्याचा आनंद घ्यावा. तरी जिल्ह्यातील सर्व तालुकाप्रमुख व सेंटर प्रमुख यांना विनंती आहे की, ही सूचना सर्व ध्यान सेंटरवर द्यावी. जेणे करून जास्तीत जास्त सहजयोगी आदिगुरू पुजन सोहळ्यात सहभाग नोंदवतील. पुजेला येतांना दादांनी कुर्ता पायजमा, ताईंनी काठा पदराची साडी तसेच सर्वांनी मीठपाणी करूनच पुजेचे आशिर्वाद ग्रहण करण्यासाठी येणे गरजेचे आहे. कार्यक्रमस्थळी सर्व सहजयोगींनी वेळेच्या अगोदर अर्धा तास आधी यावे जेणे करून आपला कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. अधिक माहितीसाठी मराठवाडा कॉर्डिनेटर दीपकभाऊ स्वामी ९५२७५३९०९०, जिल्हा कॉर्डिनेटर भागवतभाऊ काकडे ९७६५५१८८८३ व बीड सेंटर प्रमुख शितल ताई ७२४८९०३३९५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बीड जिल्हा सहजयोग समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Sharing

Visitor Counter