गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवार दि.13 जुलै रोजी 

Beed

गोरक्षनाथ टेकडी येथे बुधवार दि.13 जुलै रोजी 

ह.भ.प.कल्याण महाराज देवडकर यांचे कीर्तन

बीड/प्रतिनिधी

विसाव्या शतकातील महान संत किसनबाबा यांच्या २4 व्या वर्षातील अकरावी पुण्यतिथी आषाढ शुद्ध गुरुपौर्णिमे पंढरपूरचा काला निमित्त श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी ता.जि.बीड येथे ह.भ.प.कल्याण महाराज देवडकर रामगाव यांचे बुधवार दि.13 जुलै 2022 रोजी दुपारी 12 ते 2 या दरम्यान कीर्तन होणार आहे. तरी या किर्तनाचा व महाप्रसादाचा या परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीचे गुरूवर्य शांतीब्रह्म ह.भ.प.नवनाथ महाराज व समस्त गावकरी मंडळी बकरवाडी ता.जि.बीड यांनी केले आहे. तसेच गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भांद्री पर्वत प्रदक्षिणामध्ये सकाळी ९ ते १० यावेळेत सहभागी होता येईल.

 

Sharing

Visitor Counter