साडेपाच लाखाचा गुटखा पकडा

साडेपाच लाखाचा गुटखा पकडा
बीड/प्रतिनिधी
गुटख्याच्या १ ९ गोण्या घेवुन जात असलेल्या इरटिगा गाडीला पोलीसांनी ताब्यात घेतले असुन यावेळी केलेल्या तपासणीत गाडीच्या डिग्गीमध्ये ६ लाख रूपयांची रोकड आढळुन आली . पोलीसांनी गुटखा , रोकड आणि इरटिगा गाडी , मोबाईल असा एकुण १६ लाख ८५ हजार ७५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे ३ वाजता कुर्ला रोडवर कारवाई केली . यावेळी पोलीसांनी इरटिगा गाडी क्र . एम . एच . २४ ए.एस .३४८२ सह् गुटखा आणि रोकड जप्त केली आहे . परशुराम मोहन गायकवाड आणि गोविंद नवनाथ खांडे ( वय २६ रा . पिंपळगाव मजरा ता . बीड ) या दोघांनाही पोलीसांनी ताब्यात घेतले आहे . ही कामगिरी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर , अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार , डीवायएसपी संतोष वाळके , स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतिष वाघ यांच्या मागदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने केली आहे .
