उर्दू साहित्यिक वजाहत कुरेशी यांच्या चष्मे राह पुस्तकास पारितोषिक

Beed

उर्दू साहित्यिक वजाहत कुरेशी यांच्या चष्मे राह पुस्तकास पारितोषिक

औरंगाबाद येथे संपन्न झाला सत्कार समारंभ 

औरंगाबाद/प्रतिनिधी

हलक़ये आलमगीर अदब व तंजीम तरक्की उर्दू बीड च्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखक व साहित्यिक वजाहत कुरेशी यांनी लिहिलेले पुस्तक चष्मे राह ला महाराष्ट्र उर्दू साहित्य परिषद मुंबई कडून पारितोषिक मिळाले. या निमित्ताने त्यांचा औरंगाबाद येथे हृदयी सत्कार करण्यात आला. 

यावेळी बीडहून उर्दू साहित्यिक, लेखक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद हसीन अख़्तर यांची विशेष उपस्थिती होती. हसीन अख्तर यांनी वजाहत कुरेशी यांचा तंजीम तरक्की उर्दू च्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन ह्रदयी सत्कार केला.

हा सत्कार समारंभ औरंगाबाद शहरातील मौलाना आझाद रोडवरील प्रोफेसर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उर्दू कवी असलम मिर्झा होते. सूत्रसंचालन उर्दू कवी जावेद निदा यांनी केले तर प्रस्तावना डॉक्टर सिद्दिकी सायमोद्दीन यांनी केली. 

यावेळेस वजाहत कुरेशी यांच्या जीवनावर आकाशवाणी औरंगाबाद वरून सबरंग कार्यक्रम सादर करणारे निवेदक तथा उर्दू साहित्यिक नुरूल हसनैन यांनी प्रकाश टाकला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सईद खान जैदी, डॉक्टर अजीम राही, प्रा. शकील अहेमद खान, प्रा. अक्सरी व उर्दू कवी अहेमद औरंगाबादी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉक्टर सिद्धीकी सायमोद्दीन यांनी आभार प्रदर्शन केले.

 

Sharing

Visitor Counter