ओतारी समाजावर वेळ आली उपाशी बसण्याची !

वडवणी/प्रतिनिधी
ओतारी समाजाचा हातावर पोट असल्याने रोजंदारी बंद पडल्याने उपाशी बसण्याची वेळ ओतारी समाजावर आलेली दिसत आहे.
वडवणी शहरात ओतारी समाजाची संख्या जवळपास २०० आहे परंतु आज ओतारी समाज हा भटक्या जमातीत येत असल्याने त्यांना रोज करून खाण्याईतपत ते कमवत आहे परंतु या लाॅकडाउन असल्याने त्यांची कमाई बंद पडलेली व त्यांना उपाशी मरण्याची वेळ आलेली दिसुन येत आहे.
ओतारी समाज रोज काम केल्याशिवाय आपला उदरनिर्वाह भागु शकत नाही किंवा या समाजा कडे दुसरा कोनताच पर्याय नसल्याने या समाजाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे कारण लाॅकडाउन व संचारबंदी मुळे हे लोक रोड वर येताना दिसत आहे.
प्रशासनाने रेशनकार्ड धारकांना धान्य मुफ्त वाटप केले आहे परंतु ज्यांच्या कडे शिधापत्रीका नाही अशा लोकांनी काय करावे?
री प्रशासनाने यांचा विचार करण्याचे गरजेचे आहे व अशा लोकांना मुफ्त धान्य देण्यात यावे अशी मागणी ओतारी समाजचे प्रमिला ताई माळी ओतारी युवा पत्रकार संघ यांनी केली आहे.








