" विक्की (आण्णा) पाचंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा जल्लोष नव्हे रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी

" विक्की (आण्णा) पाचंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचा जल्लोष नव्हे रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी
बीड/वार्ताहर
सतत दोन वर्षांपासून आपण कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहोत. आणखी ही रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने पापनेश्वर मित्रमंडळाचे अध्यक्ष विक्की आण्णा पाचंग्रे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग दुसऱ्या वर्षीसुध्दा म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
याविषयी बोलताना विक्की आण्णा म्हटले कि,
रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजेच्या वेळेस मागेल त्याला रक्त उपलब्ध व्हावे याकरीता हा अभिनव उपक्रम सुरू राहणार आहे. महामारीच्या काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता महा रक्तदानाचा उपक्रम महत्त्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्सवी स्वरूप न देता रक्तदाना सारख्या पवित्र कार्यामधून मित्र परीवाराने रक्तदान करून शुभेच्छा द्याव्यात वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे लागतात. . ही बाब लक्षात घेता विक्की आण्णा पाचंग्रे यांच्या विचारातुन ही रक्तदानाची सुरूवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो वा स्वतःचा वाढदिवस असो ते हे शिबीर आयोजित करतात त्या मुळे ती व्यक्ती रक्तदान करत आहे व ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांना या शिबिराच्या माध्यमातून योग्य वेळी रक्ताची उपलब्धता होईल आणी काही व्यक्तींचे प्राण वाचले जातील तोच खरा वाढदिवस साजरा झाला असे समाधान लाभेल त्या मुळे सर्व मित्र परीवारानी 1 ऑगस्ट 2022 रोजी पापनेश्वर मंदीर तेलगाव नाका बीड या ठिकाणी उपस्थित राहुन रक्तदान करावे असे आवाहन पापनेश्वर मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे
