जोहर करिअर मार्गदर्शन केंद्राकडून जनतेच्या मूलभूत अधिकाराविषयी परिसंवाद चर्चा सत्र संपन्न

जोहर करिअर मार्गदर्शन केंद्राकडून जनतेच्या मूलभूत अधिकाराविषयी परिसंवाद चर्चा सत्र संपन्न
बीड/प्रतिनिधी
शहरातील जोहर करिअर मार्गदर्शन केंद्राकडून जनतेच्या मूलभूत अधिकाराविषयी परिसंवाद व चर्चा सत्र दिनांक ३१ जुलै रविवार रोजी आयोजित करण्यात आले होते. यामध्ये कायदेविषयक सल्ला माहिती व अधिकार याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या परिसंवाद चर्चासत्रामध्ये जमात ए इस्लामी हिंदचे बीड जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद शफीख हाशमी सर, ॲड. सय्यद अजीम, ज्येष्ठ साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्ते सय्यद हसीन अख्तर, गुलाम साकिब सर यांनी जनतेच्या मूलभूत अधिकाराविषयी माहिती देऊन या माहिती बरोबरच जनतेचे मूलभूत अधिकार व कायदेविषयक सल्ल्याचे महत्व विषद केले. तसेच कायदा हा जनहितासाठी आहे. फक्त कायद्याची योग्य माहिती घेऊन त्यानुसार कार्य केल्यास आपल्यासमोर कोणत्याही अडचणी न येता हाती घेतलेले काम योग्य रीतीने पार पाडता येते असे म्हटले.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक खतीब मिसबाहूल आबेदिन यांनी कुरआन पठण करून केली. प्रस्तावना ज्येष्ठ शिक्षक मुहम्मद इलयास सर यांनी केली. सूत्रसंचालन गुलाम साकीब सर यांनी केले.
काजी मुजीबुर्रहमान सर, शकील पठाण सर, डॉ. इमरान खान सर, सईद सर, मुस्तजीब सर, सय्यद लईख सर, साजेद मुजाहिद सर, मिन्हाज सर, अन्वर इकबाल सर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजक मुहम्मद इलयास सर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
