अंबाजोगाईत महिलेंनी केला गर्भपात करण्याचा प्रयत्न 

Beed

अंबाजोगाईत महिलेंनी केला गर्भपात करण्याचा प्रयत्न 

अंबाजोगाई/प्रतिनिधी 

२२ आठवड्यांचा गर्भ असलेल्या महिलेने गर्भपाताच्या गोळ्या सेवन केल्या . त्यामुळे तिची प्रकृती खालावल्याने ती अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात आली . येथील डॉक्टरांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विचारपूस केली . आपली पोलखोल होणार , याचा संशय येताच महिलेने रुग्णालयातून पळ काढला . याबाबत स्वारातीच्या स्त्री रोग विभागाच्या प्रमुखांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल तक्रार दिली आहे . या प्रकाराने मेडिकलवर सर्रासपणे गर्भपाताच्या गोळ्या मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे . अंबाजोगाई तालुक्यातील २७ वर्षीय महिला २२ जुलै रोजी सायंकाळी ७.१६ मिनिटांनी स्वाराती रुग्णालयात दाखल झाली . यावेळी त्यांनी जुनी सोनोग्राफी तपासली . ती ६ जून रोजी केलेली होती . त्यावर १ ९ आठवड्यांचा गर्भ असल्याचे दिसले . यावेळी त्यांनी हा त्रास कशामुळे झाला , असे विचारताच रुग्णासोबत असलेल्या नातेवाइकांनी त्यांना गर्भपाताच्या गोळ्या दाखविल्या . डॉक्टरांनी त्या लागलीच जप्त केल्या . त्यानंतर दोन दिवस उपचार घेऊन २४ जुलै रोजी रात्री ८ वा . ही महिला रुग्ण पळून गेली . हा सर्व प्रकार अवैध गर्भपाताचा असल्यामुळे स्त्रीरोग व प्रसुती विभागाच्या प्रमुखांनी अंबाजोगाई शहर ठाणे गाठून तक्रार दिली . परंतु याला आठवडा उलटला तरी यावर पोलिसांनी कसलीच कारवाई केली नसल्याचे सांगण्यात आले .

Sharing

Visitor Counter