अशपाक भाई ने भगवान बाबा मंदिराकडे जाणाऱ्या खराब,चिखलमय रस्त्यावर मुरूम टाकल्याने आभार 

Beed

अशपाक भाई ने भगवान बाबा मंदिराकडे जाणाऱ्या खराब,चिखलमय रस्त्यावर मुरूम टाकल्याने आभार 

मंदिराकडे जणारा खराब,चिखलमय रस्त्यावर मुरूम टाकून अशपाक भाई ने माणुसकी दाखवली. 

बीड/प्रतिनिधी

बीडदिनांक 1 जुलै बीड शहरात भुयारी गटारी योजनेच्या नावाखाली मुख्य रस्ता तसेच गल्लो गल्ली चांगले रस्ते खाजगी कम्पनी इंद्रायणी कन्ट्रक्शन ने खोदून ठेवले आहेत.त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

आमदार संदीप(भय्या)क्षीरसागर यांच्याकडे खराब रस्त्यावर मुरूम टाकून लेवल करावी अशी मागणी माजी नगरसेवक अशपाक इनामदार यांनी केली व पाठपुरावा करत रस्त्यावर मुरूम टाकण्यास सुरुवात करण्यात आली.

बीड शहरात बार्शी रोड लगत श्री.संत भगवान बाबाचे एकमेव मंदिर असून मंदिराकडे जाणारा रस्ता ड्रेनेज पाईप च्या कामामुळे मागील दोन महिन्यापासून अत्यंत खराब,चिकलमय झाला होता वारंवार मागणी करून देखील खाजगी कम्पनी इंद्रायणी कंट्रक्शन हा खोदलेला रस्ता लेवल करून देत नव्हती याची तक्रार जिल्हा अधिकारी बीड यांना रहिवाशी यांनी केली आहे.या रस्त्यावर चिखल झाल्याने भाविक भक्तांना, शाळेत जाणारे मुले, तसेच महिला,नागरिक यांना खुप त्रास सहन करावा लागत होता ऐक महिला दुचाकी घसरून मुलांला घेऊन चार दिवसापूर्वी पडून जखमी झाली आहे.सुदैवाने जास्त मार लागला नाही.ही गोष्ट माजी नगरसेवक अशपाक भाई ना स्थानिक नागरिकांनि सांगितली व रस्ता दाखवून मुरूम टाकून देण्याची विनंती केली.अशपाक भाई ने या मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर लगेंच मुरूम टाकन्यास सुरुवात करून माणुसकीचे दर्शन घडवले.त्यामुळे नागरीका कडून नागरिकांनी कौतुक करण्यात आले त्यावेळी वार्डातील काही अडचणी असतील तर तात्काळ सोडवण्यात येतील असे आश्वासन अशपाक भाई ने दिले. या वेळी सचिन काळे,मयूर कुलकर्णी,अशोक जोगदंड, संतोष गायकवाड,सुंदर भिसे,दत्तात्रय कुलकर्णी,संजय लघाने,राजू डोळस,दादा मिसळे सह रहिवाशी यांनी आभार मानले.

Sharing

Visitor Counter