तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी

तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी साजरी
बीड/प्रतिनिधी
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त तुलसी शैक्षणिक समूहाच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डी.जी.निकाळजे,प्राचार्य उमा जगतकर,प्राचार्य अश्विनी बेद्रे यांनी दोन्ही महान विभूतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अण्णाभाऊ साठे यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. मराठी साहित्यातील लोकनाट्य,पोवाडे,लावणी,प्रवास वर्णन,कथा,कविता,गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. त्यांना लोकमान्य ही पदवी देखील बहाल करण्यात आली, ज्याचा अर्थ लोकांनी त्यांचा नेता म्हणून स्वीकार केला.१ ऑगस्ट रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,बीड,तुलसी इंग्लिश स्कूल,बीड व तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन बीडच्या वतीने या दोन्ही महान विभूतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डी.जी.निकाळजे,प्राचार्य उमा जगतकर,प्राचार्य अश्विनी बेद्रे यांच्यासह सर्व प्राध्यापक,शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
