मोकाट जनावरे व कुत्रे नगरपालिकेत सोडणार-अशपाक ईनामदार

Beed

मुख्य रस्त्यावरच मोकाट जनावरे व कुत्र्यामुळे वाहतूकीस अडथळा व अपघात होत आहेत.

प्रतिकात्मक बैल व कुत्रा सि.ओ.ना भेट म्हणून देणार 

मोकाट जनावरे व कुत्रे नगरपालिकेत सोडणार-अशपाक ईनामदार

कोंढवाडा फक्त नावालाच आहे का...? 

बीड/प्रतिनिधी

बीड दिनांक 3 ऑगस्ट बीड शहरात सर्वच रस्त्यावर सध्या भटके जनावरे,कुत्रे रस्त्याच्या मधोमध बसतात त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच पण अपघात देखील झाले आहेत. दोन दिवसापूर्वी जिल्हा परिषद बीड समोर ऐक महिलेला जनावर अचानक आडवे आल्याने महिला गाडीवरून पडून जखमी झाली.तर दुसरी घटना तेलंगाव रोडवर आदित्य इंजिनियर कॉलेज जवळ कोरडे नामक व्यक्तीला अचानक कुत्रे आडवे आल्याने ते गाडीवरून पडल्याने त्यानंच्या हाताला व पायाला दुखापत झाली आहे. सोमोरून ऐक चारचाकी मालवाहू ट्रक येत होता पण सुदैवाने ते बचावले. रहदारीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावरच हें जनावरे बसतात वाहतूकीस अडथळा होऊन आहे आणखी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.नगरपालिकेच्या सि.ओ. ना पोळ्यासाठी तयार केलेले प्रतीकात्मक बैल व कुत्रे भेट म्हणून देणार. नगरपालिकेचा कोंढवाढा फक्त नावालाच आहे का असा प्रश्न यावेळी नागरिकांना पडला असून.या जनावरामुळे होणाऱ्या त्रासापासून,अपघातापासून वाचवावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे. शहरातील तेलंगाव रोड, बार्शीरोड,बस स्टॅन्ड समोर, सुभाष रोड,झमझम कॉलनी,मोमीनपुरा,खासबाग, मालवेस,धोंडीपुरा,कारंजा रोड,भाजी मंडी, डॉ. आंबेडकर पुतळा,मोंढा,जालना रोड,नगर रोड तहसील,कोर्टा समोर,माने कॉम्प्लेक्स,पालवन चौक,बार्शी नाका,गांधी नगर, के.एस. के.कॉलेज,शासकीय रुग्णालय अश्या जवळजवळ सर्वच रस्त्यावर गल्लो गल्लीत मोकाट जनावरे व कुत्र्याच्या संख्या वाढली असून त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. काही कुठे पिसाळले असल्यामुळे लहान मुलांना तसेच नागरिकांना यापूर्वी चावा घेतलेला आहे.त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.लवकर यांचा बंदोबस्त नाही केला तर हें नगरपालिके मध्ये जनावरे व कुत्रे नेऊन सोडणार असा इशारा माजी नगरसेवक अशपाक ईनामदार यांनी सि.ओ.ढाकणे यांना दिला आहे.

Sharing

Visitor Counter