एमएचटी - सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात मनाई आदेश

एमएचटी - सीईटी परीक्षा उपकेंद्र परिसरात मनाई आदेश
बीड/वार्ताहर
राज्य सामाईक प्रवेश कक्ष, महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र व कृषि तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पध्दतीने एमएचटी - सीईटी - 2022 ही परीक्षा दि. 05 ते 20 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यासाठी दिशा कॉम्प्युटर एज्युकेशन, बीड, एस. टी. स्टँडच्या मागे, मौजकर होलसेल दुकानानजीक, शिक्षक कॉलनी, बीड या उपकेंद्रात ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून, परीक्षा शांततेत पार पाडण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परीक्षा कालावधी पूर्ण होईपर्यंत परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे, असे उपविभागीय दंडाधिकारी, नामदेव टिळेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
