अवैध गर्भपात प्रकरणातील नविनच खुलासा समोर;अवैध गर्भपातासाठी वापरलेल्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्यांचा बॅच नं.एकच

Beed

अवैध गर्भपात प्रकरणातील नविनच खुलासा समोर;अवैध गर्भपातासाठी वापरलेल्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्यांचा बॅच नं.एकच

बीड/प्रतिनिधी

जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बकरवाडी येथे झालेल्या अवैध गर्भपात प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाला होता . याच प्रकरणात आता एक नवा खुलासा झाला असून महिलेच्या गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि उपजिल्हा रुग्णालयातील गोळ्याचा बॅच क्रमांक एकच असल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे . या गर्भपात प्रकरणात मनीषा सानप या अंगणवाडी सेविकेला पोलिसांनी गेवराईतून अटक केली होती . मनीषा सानप हिच्याकडे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्याचा बॅच क्रमांक आणि उपजिल्हा रुग्णालयात वापरल्या जाणाऱ्या गर्भधारणाच्या गोळ्याचा बॅच क्रमांक एकच आढळून आल्याने बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे . या सर्व प्रकरणानंतर आता औषध प्रशासनाने बीडच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांना पत्र लिहून गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयासह इतर आरोग्य केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत .

Sharing

Visitor Counter