विहीरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू!

Beed

विहीरीत पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू!

सिरसाळा/प्रतिनिधी

विहिरीवर पाणी आणण्यासाठी नवविवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी ( दि . ७ ) उघडकीस आली . ही घटना धारुर तालुक्यातील सुकळी येथे घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहे . ङ्गराणी गणेश राऊत ( वय २१ रा . सुकळी ता . धारुर ) असे विहिरीत बुडालेल्या नवविवाहितेचे नाव आहे . माजलगाव तालुक्यातील उमरी हे माहेर असून तीन महिन्यापूर्वी गणेश राऊत या तरुणाशी विवाह झाला होता . रविवारी राणी ही पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती . काठोकाठ भरलेल्या विहिरीचे पाणी घेतांना ती पाय घसरल्याने विहिरीत पडली . तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे . विहीर खोल असल्याने प्रेत बाहेर काढण्यासाठी गावातील नागरिकांनी खुप प्रयत्न केले . मात्र त्यांना अपयश आले . त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले . यावेळी अग्नीशमन दलाचे प्रमुख सुनिल आदोडे व त्यांच्या टिमने अथक परिश्रमानंतर प्रेत बाहेर काढले . घटनास्थळी सिरसाळा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेळके , पोह . मिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली . या घटनेने सुकळी गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे .

Sharing

Visitor Counter