मनसेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक उंबरकर यांची निवड 

Beed

मनसेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक उंबरकर यांची निवड 

आष्टी/प्रतिनिधी 

गेवराई येथे मनसेच्या आढावा बैठकीत आष्टी मतदार संघात विस्तार जोमाने करण्याचे काम सुरू केले आहे.होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदच्या निवडणूकीच्या अंनुसगाने झालेल्या आढावा बैठकीत मनसेचे मराठवाडा संपर्क प्रमुख दिलीप धोत्रे यांच्या संमतीने तसेच सरचिटणीस संतोष नागरगोजे, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, महिला राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या उपस्थितीत मनसेच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी दिपक उंबरकर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी सर्व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांना येणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते निवडून आणावे आदेश देऊन आणि जेणेकरून सामान्य जनतेचे प्रश्न प्रशासन दरबारी सोडविण्यास मदत होईल तरी या निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीस लागावे असे प्रतिपादन मराठवाडा संपर्क प्रमुख दिलीप धोत्रे यांनी केले. तसेच यावेळी बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यामध्ये बीड जिल्हा उपाध्यक्षपदी आष्टी येथील दिपक उंबरकर यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे.मनसेचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी त्यांची नियुक्ती पत्र देऊन निवड केली व स्वागत करण्यात आले.यावेळी मनसेचे नेते कैलास दरेकर, आष्टी तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मेटे, बाबासाहेब झांबरे,जयदिप मिसाळ, महेश अनारसे, संतोष मंजूळे आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter