महाराष्ट्रात मातंग समाजातील व मागासवर्गीय लोकांचे हत्याकांड मातंग समाजावरील अन्याय अत्याचारात वाढ

Beed

महाराष्ट्रात मातंग समाजातील व मागासवर्गीय लोकांचे हत्याकांड मातंग समाजावरील अन्याय अत्याचारात वाढ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लक्ष देवून समाज कंटकाला कडक शासन करावे - गोरख काळे

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या मातंग समाज व मागासवर्गीय समाजातील लोकांचे ठिकठिकाणी हत्याकांड घडत असून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मातंग व मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत तरी या घटनांना आळा घालून मातंग व मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यात यावा या मागील आठवड्यामध्ये पिसादेवी तालुका जिल्हा औरंगाबाद येथील मातंग समाजातील जनार्दन कसारे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांचा खून करण्यात आला शिंगणापूर तालुका जिल्हा परभणी येथील मातंग समाजातील गोविंद कांबळे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला बोलेगाव तालुका घनसांगवी जिल्हा जालना येथील मातंग समाजातील कोंडीराम हिवाळे यांना विषारी औषध पाजून जीवे मारले असता या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रुपये आर्थिक मदत करून त्यांच्या परिवारातील एका सदस्याला शासकीय नोकरी सांमावुन घेण्यात यावे अशी मागणी मांग गारुडी समाजाचे जिल्हाअध्यक्ष गोरख काळे यांच्या वतीने करण्यात आली मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे यांना,मांग गारुडी समाजाचे जिल्हाअध्यक्ष गोरख काळे यांच्या वतीने वतीने करण्यात आहे.

Sharing

Visitor Counter