दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीराचे भव्य आयोजन

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबीराचे भव्य आयोजन
परळी / प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे , व विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य कसे राहील या उद्देशाने दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन दिनांक २५ / ०८ / २०२२ गुरुवारी रोजी करण्यात आले होते .
या आरोग्य शिबिरास परळी वैजनाथ येथील सर्व नामांकीत डॅाक्टर्स उपस्थित होते ज्यामध्ये श्री . विजय रांदड ( बालरोगतज्ज्ञ ) , डॉ . राजेश जाजू ( बालरोगतज्ज्ञ ) , डॉ . गुरुप्रसाद देशपांडे ( बालरोगतज्ज्ञ ) , डॉ . संजय गित्ते ( बालरोगतज्ज्ञ ) , डॉ . व्यंकटेश तिडके ( बालरोगतज्ज्ञ ) डॉ . तेजस्विनी मुंडे ( स्त्रीरोगतज्ज्ञ ) , डॉ . अजय मुंडे ( त्वचारोग तज्ञ ) , डॉ . मंगेश गित्ते ( कान , नाक , घसा तज्ञ )
डॉ . अशोक लोढा ( दातांचे तज्ञ )
डॉ . दिनेश लोढा ( दातांचे तज्ञ )
डॉ . हार्दिक लोढा ( दातांचे तज्ञ )
डॉ . सतीश दौंड ( दातांचे तज्ञ )
डॉ . अमोल होळंबे ( दातांचे तज्ञ )
सर्व आजार प्रकारांचे उच्चविद्याभुषित डॉक्टर्स उपस्थित असल्याने विद्यार्थ्याची आरोग्य तपासणी, आजार टाळण्यासाठीची काळजी तसेच निरोगी व सुदृढ जिवनप्रणाली जगण्यासाठीचे प्रबोधन देखील करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शारिरिक व मानसिक आरोग्य वृद्धींगत करण्यासाठी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले व तसेच विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार , व व्यामाचे महत्त्व पटवून देण्यात आले .
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हेल्थ कार्ड जतन केले जाते व वार्षिक आरोग्य तपासणी करून अद्यावत केले जाते.
अशा प्रकारचे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबाबत विद्यार्थी व पालकांनी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती उषा किरण गित्ते व दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलचे प्राचार्य श्री. विठ्ठल तुपे सरांचे आभार मानले.
शाळेतील आरोग्य शिबीर यशस्वी करण्याकरिता दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागील एक महिण्यापासून सखोल व उत्तम नियोजन केले.
