शहर पोलिस ठाण्याची धडाकेबाज कारवाई;सोने चोरास केला गजाआड

शहर पोलिस ठाण्याची धडाकेबाज कारवाई;सोने चोरास केला गजाआड
बीड/प्रतिनिधी
शहर ठाण्याचे पोनि . रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने बारा तोळे सोन्यासह अट्टल चोरट्यास औरंगाबादेतून गजाआड केले . दरम्यान शहर ठाण्याच्या टिमने चोरीच्या प्रकरणाचा तपास लावत केवळ आरोपीच गजाआड केला नाही तर त्याच्याकडून गेलेल्या मुद्देमालाची रिकव्हरी केली आहे . ही बाब महत्वाची आहे . कृष्णकुमार काळेगावकर ( रा . बोबडेश्वर गल्ली , बीड ) हे न्यायालयात लिपिक आहेत . २४ ऑगस्ट रोजी रात्री जेवण करून कुटुंब झोपी गेले . २५ रोजी पहाटे सव्वातीन वाजता वाड्याच्या भिंतीवरून घरात शिरलेल्या चोरट्याने बेडरूममध्ये प्रवेश केला . खिळ्याला लटकवलेल्या चावीने कुलूप उघडून ३ लाख ८८ हजार ४३५ रुपयांचे साडेबारा तोळे दागिने लंपास केले . मंगल कृष्णकुमार काळेगावकर यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला . दरम्यान , पो . नि . रवि सानप यांच्या मार्गदर्शनाखाली डी . बी . पथकाचे हवालदार बाळासाहेब सिरसाट , अंमलदार मनोज परजणे , सय्यद आशपाक , अविनाश सानप यांच्या पथकाने तपास गतिमान केला . सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे तीन वाजता य गल्लीतून जाताना शेख कलीम शेख अलीम ( २५ , रा . दहिफळ , ता . बीड हमु . औरंगाबाद ) हा आढळला . तो भिंतीवर चढून घरफोड्या करण्याचा संशय असल्याने त्याच्या मागावर पथक रवाना केले .
