बीड जिल्हा शासकीय रुग्णालय परीसरात घानिच साम्राज्य; तात्काळ स्वच्छता व्हावी - बाळासाहेब धुरंधरे

बीड जिल्हा शासकीय रुग्णालय परीसरात घानिच साम्राज्य; तात्काळ स्वच्छता व्हावी - बाळासाहेब धुरंधरे
दवाखाना परीसरात वाढलेल्या अस्वच्छता, कचऱ्यामुळे व साचलेल्या पाण्यामुळे अनेक आजारांना मिळुशकते आमंत्रण.
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्हा रुग्णालय कुठल्या न कुठल्या विषयामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहे. त्यातच आता पावसाळा चालु असल्याने जिल्हा रुग्णालय परीसरात सर्वत्र कचरा, खड्यात पाणी, साचलेले चित्र दिसत असुन यामुळे वाढते मच्छरचे प्रमाण, माश्या, आणी सर्वत्र दुर्गंध, पसरलेली प्रत्यक्ष दर्शनी दिसते. त्याचबरोबर दवाखान्या बाहेर म्हणजे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या ऑफीसच्या दालना समोरच चक्क पावसाचे पाणी जमा होत असून ईथुन जाताना रुग्ण व नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. तसेच ठिक आय सी यु वार्ड समोरही मोठी दुर्गंध येते, त्यामुळे याठिकाणी नियमीत दोनवेळा स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा येथील रुग्ण, व त्यांच्या नातेवाईकांना या पासुन आजाराला मोठे आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच या दवाखान्यात अहोरात्र रुग्णांची सेवा करणारे जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर, सर्व स्टाफ, व कर्मचारी रुग्णांना सेवा देत असतात यात काही शंकाच नाही, पण स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक ईथे तत्पर असताताना तरीही ईथे अस्वच्छतेचा प्रशन हमेशा येरणी वर का असतो.? तसेच या दवाखान्यात व बाहेरील आवारातील परीसरातील स्वच्छता करण्याची जिम्मेदारी कोणाची आहे.? त्यांनाही कडक आदेश होणे गरजेचे असुन. असे अनेक प्रशन या दवाखान्यात प्रलंबित आहेत. दवाखाना बाहेरील आवारात रुग्ण व नातेवाईक जेवण करण्याकरता येतात मग इथे आरोग्याचा प्रशन उद्भवतो का नाही! म्हणुन मा. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दवाखान्यात व बाहेरील आवारातील नियमीत दोनवेळा स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी यांना सक्तीने नियम करावे व दवाखाना परीसरात नियमीत, स्वच्छता व औषध फवारणी करावी, दवाखान्यातील व बाहेरील परीसर कायमचा स्वच्छमय करण्याच्या कर्मचारी यांना सक्तीच्या सुचना कराव्यात. व सर्व सामान्यांच्या निरोगी आरोग्याकरता तात्काळ या विषयी दखल घ्यावी. असे रुग्ण मित्र फांऊडेशन चे अध्यक्ष रोहित ऊर्फ बाळासाहेब धुरंधरे यांनी एका प्रसारमाध्यमांद्वारे कळवले आहे.
