बीडमध्ये आद्य कवयित्री महदंबेंचा कार्यक्र्म उत्साहात

Beed

बीडमध्ये आद्य कवयित्री महदंबेंचा कार्यक्र्म उत्साहात

सांस्कृतिक धोरण -व्याख्यान, कवी संमेलन, गीत गायनाला प्रतिसाद

बीड / प्रतिनिधी  

आद्य कवयित्री महदंबा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “जागर-आद्य कवयित्री महदंबेचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रम बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे मन्गलवार दि. २६ रोजी पार पडला. या कार्यक्रमात व्याख्यान, कवी संमेलन, गीत गायनाला प्रतिसाद मिळाला.

    आद्य मराठी कवयित्री, महदायिसा ह्या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या महदंबा या महानुभाव पंथीय कवयित्री होत्या.ज्ञानेश्वर मंडळात मुक्ताईचे जे स्थान तेच चक्रधर मंडळात महदंबेचे आहे. अशा आद्य कवयित्री महदंबा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअतर्गंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून “जागर-आद्य कवयित्री महदंबेचा” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

     या सांस्कृतिक कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक डॉ.सतीश साळुंके यांचे कवयित्री महदंबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान झाले.तसेच मराठी गीत गायनाचा कार्यक्रम आणि पत्रकार सुनिल डोंगरे, निळुभाऊ सावरगेकर,प्रा.विठ्ठल जाधव, आकाश जाधव, सचिन सोनवणे, प्रा. संजय कांबळे, मसलेकर या कवींच्या कवी संमेलनाने कार्यकमाला रंगत आणली. या कार्यक्रमाचे समन्वक म्हणून मुकुंद धुताडमल यांनी काम पहिले. सदरील कार्यक्रम बिभीषण चवरे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 

 

Sharing

Visitor Counter