एकल महिला संघटना च्या बीड येथील बहिरवाडी येथे गावशाखा चे थाटात उद्घाटन

Beed

एकल महिला संघटना च्या बीड येथील बहिरवाडी येथे गावशाखा चे थाटात उद्घाटन

बीड/वार्ताहर 

दि 28/09/22 रोजी बहिरवाडी येथील एकल महिला संघटना च्या गावातील 3 महिला मंडळाच्या वतीने बैठक घेण्यात आली व त्यात गावातील वयक्तिक व सामूहिक प्रश्न सोडवण्यासाठी समिती नेमली त्यात गावात एकल महिला संघटना च्या शाखेचा बोर्ड लावण्याबाबत चर्चा होऊन अध्यक्ष- नम्रता काळे सचिव - अनिता ढोरमारे कोशाध्यक्ष. पूजा काळेउपाध्यक्ष- रुक्मिणीताई लोंढे गाव समितीचे अध्यक्ष मा.नम्रता काळे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकल महिला संघटना च्या बीड तालुका सचिव रुक्मिणी नागापुरे यांनी केले यावेळी बोलताना आशालता पांडे यांनी एकल महिला संघटना ची ही ताकत खूप मोठी आहे व या माध्यामातून महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी गावात कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत, गावात दारूबंदी हिंसाचार यावर आम्ही एकल महिला संघटनाला सपोट करू महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे, गावाचा विकास निश्चित होईल. यावेळी यशस्वी महिला मंडळ, सांची महिला मंडळ, व रणरागिणी महिला मंडळ, संगिता महामुनी, संजना ढोरमारे, कान्होपात्रा वरपे, आवडा बाई गायकवाड, संगिता ढोकणे, संगिता वाघमारे, कविता गिरी, राणी शेजवळ यांच्यासह बीड टीम व इतर सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sharing

Visitor Counter