जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा संपन्न  

Beed

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा संपन्न  

बीड/वार्ताहर 

सेवा पंधरवडाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुहास कुलकर्णी यांची उपस्थित होते.

यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्याकरिता अवलंबवयाची कार्यपद्धती सांगून तृतीयपंथीयांच्या विविध प्रकाराच्या समस्याचे निराकरण केले. तसेच यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ . सुहास कुलकर्णी यांचे तृतीयपंथीयांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमास ग्रामीण विकास मंडळ बनसारोळाचे प्रकल्प व्यवस्थापक सय्यद फारुक हुसेन, समुपदेशक बापु लुंगेकर, एफ. आर. फारुकी, (डी. ए .एम अॅन्ड ई.), एल. डब्लू. एस प्रकल्प व्यवस्थापक वाघमारे रामेश्वर व टी. जी. वर्कर कल्पना बांगर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. हांगे यांनी केले.

Sharing

Visitor Counter