कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील खर्चाचे ऑडीट करून गैरव्यवहार प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशी करा

कोरोना कालावधीत आरोग्य विभागातील खर्चाचे ऑडीट करून गैरव्यवहार प्रकरणात (S.I.T.) मार्फत चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांचे पालकमंत्री अतुलजी सावे यांना निवेदन-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड/वार्ताहर
बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील कोरोना कालावधीतील खर्चाचे ऑडीट करण्यात येऊन कागदोपत्रीच बोगस खरेदीची (S.I.T.)उच्च स्तरीय स्वतंत्र कमिटीमार्फत चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्यासह शेख युनुस च-हाटकर,राहुल कवठेकर,रामनाथ खोड,धनंजय सानप,दिपक बांगर आदिंनी सहकार,ईतर मागास वर्ग व बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री बीड यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना कालावधीतील खर्चाचे ऑडीट करा
कोरोना कालावधीत बीड जिल्ह्य़ातील आरोग्य विभागातील तसेच जिल्हाप्रशासनातील वरिष्ठ आधिकारी आणि राजकीय नेते,कार्यकर्ते यांनी संगनमतानेच कागदोपत्रीच खरेदी दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केला असून कोरोना कालावधीतील खर्चाचे ऑडीट करण्यात यावे.
कोरोना कालावधीतील सॅनिटायझर,सीसीटीव्ही,विद्युत पुरवठा,रेमडीसिवीर इंजेक्शन,अतिरिक्त भरती आदि. गैरव्यवहार प्रकरणात (S.I.T.) स्थापन गुन्हे दाखल करा
बीड जिल्ह्य़ात कोरोना कालावधीत आरोग्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ आधिकारी राजकीय नेते,कार्यकर्ते यांनी संगनमतानेच नुसत्या सॅनिटायझरच्या नावाखाली ४ कोट्यावधी रूपयांची बोगस खरेदी वास्तविक अनेक व्यक्ती,स्वयंसेवी संस्था यांनी हजारो लिटर सॅनिटायझर मोफत दिलेले आहे. तसेच आवश्यकता नसताना
अवाजवी किंमतीच्या बंद अवस्थेतील सीसीटीव्ही खरेदी दाखवून मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचे सिद्ध होऊन सुद्धा कारवाई करण्यात आली नाही तसेच बीड जिल्ह्य़ातील विद्युतीकरण नावाखाली पुढारी आणि ठेकेदारांनी कोरोनाच्या नावाखाली सव्वा सहा कोटी रूपयांचा अनावश्यक खर्च दाखवून अपहार केला तसेच अनावश्यक रंगरंगोटी,दुरूस्तीच्या नावाखाली अनावश्यक खरेदी तसेच रेमडीसिवीर इंजेक्शन वाटपात मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून बीड जिल्हारूग्णालयात साडेपाच पट रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून व राजकीय पक्षाच्या कार्यालयातुन पैसे घेऊन त्याचे वाटप करण्यात आले. बीड जिल्हा रूग्णालयातील कोरोना कालावधीत कोविड संसर्गावरील उपचारांसाठी मनुष्यबळ भरतीत खाटांच्या संख्येच्या मर्यादीत भरतीचा दंडक मोडून बीड जिल्हा रूग्णालयात अतिरिक्त मनुष्यबळाची भरती करून प्रशासकीय अनियमितते बरोबरच मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला.
बीड जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीतील गैरव्यवहार प्रकरणात डाॅ.जयश्री बांगर सह सहका-यांवर गुन्हे दाखल करा
बीड जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीतील अनियमितता तसेच गैरव्यवहार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते यांच्या निवेदन आंदोलनानंतर आरोग्य संचानालयाने नेमलेल्या चौकशीत गेल्या २०१३ ते २०१९ कालावधीत डाॅ.जयश्री बांगर त्यांचे बंधु गणेश बांगर आणि सहका-यांनी रक्तदान करणा-या लोकांच्या नावावर अनुदान परस्पर हडप केले असून रक्तपेढी विभागाचा आर्थिक फायद्यासाठी वापर केल्याचे तसेच शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करून वेतन गैरहजेरीत वेतन काढण्यासह बोगस कंत्राटे राजरतन जायभाये,आजिनाथ मुंढे,शेख रियाज,ठाकर आदिंना नियमबाह्य टेंडर देण्यात आली. संबधित प्रकरणात रक्तपेढी विभागप्रमुख डाॅ.जयश्री बांगर
यांच्यासह सहका-यांवर गुन्हे करण्यात यावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
