ऊसतोड कामगार इब्राहिम शेख याच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर जखमी

Beed

ऊसतोड कामगार इब्राहिम शेख याच्या अंगावर स्कार्पिओ गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर जखमी

पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू 

बीड/प्रतिनिधी

दि. 10 जातेगाव फाटा येथे इब्राहीम शेख हा आपल्या दररोजच्या ऊसतोड च्या कामासाठी मोटरसायकल वरून जात असताना तुझ्याकडे आमची उचल आहे,पैसे फिरतात म्हणून ऊसतोड मुकादमाने मालकाने,बाबा उबाळे,शिवाजी उबाळे यांनी नाहक कुरापत करत दोन मोटर सायकल व स्कार्पिओ गाडी पाठलाग चालू केला, कसाबसा मोटरसायकलच्या तावडीतून इब्राहीम शेख रोड साईड पंख्याच्या बाजूने गेला परंतु पाठीमागून चार ते पाच लोक स्कार्पियो तून पाठलाग करत होते व त्यांनी पाठीमागून मोटरसायकल वर बसलेल्या इब्राहिम शेख यास जोराची धडक दिली,तो धडक दिल्यानंतर, खाली पडला व गंभीर जखमी झाला त्याच्या खांद्याला पायाला गंभीर इजा व दुखापत झाली आहे, तो खाली पडल्यानंतर त्याच्या खिशातील रोख रक्कम रुपये पन्नास हजार,एक अँड्रॉइड मोबाइल,व त्याची स्वतःची मोटरसायकल या हल्लेखोर लोकांनी काढून घेतले व त्या ठिकाणांची पसार झाले.कसल्या प्रकारची देणे घेणे नसताना जाणीवपूर्वक हल्ला करून जखमी केले आहे सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झाला नसून अद्यापही मारेकरी पकडले गेले नाहीत,पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे, मारेकऱ्यांना अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी इब्राहिम शेख यांनी व कुटुंबाने केली आहे.

Sharing

Visitor Counter