पाटोदा लघु पाटबंधारे उप विभागगीय कार्यलयात कर्मचारी दाखवा बक्षीस मिळवा
Beed

पाटोदा लघु पाटबंधारे उप विभागगीय कार्यलयात कर्मचारी दाखवा बक्षीस मिळवा
सहा कर्मचारी असताना भर दुपारी फक्त एकच कर्मचारी उपस्थित असताना कार्यालयाला कुलूप कसे
पाटोदा/वार्ताहर
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे असे समजले जाणारे कार्यालय म्हणजे लघु पाटबंधारे उप विभाग कार्यालय असून त्या कार्यालयात फक्त झेंडा वंदन पुरते कर्मचारी पाहिला मिळतात बाकी कधी पाहिले तरी कार्यालयाला कुलूप पाहिला मिळत असून आष्टी पाटोदा शिरुर तालुक्यात सतत धार पाऊस होत असताना महत्त्वाच्या विभागाचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी गायब राहतात कसे ते मुख्यालयी राहतात का यांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केले आहे
