नायगाव वन विभागाची माहिती मागताच कर्मचार्यांचे धाबे दणाणले - किस्कींदा पांचाळ

नायगाव वन विभागाची माहिती मागताच कर्मचार्यांचे धाबे दणाणले - किस्कींदा पांचाळ
बीड/प्रतिनिधी
बीड येथील नायगाव वन विभागाला माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागताच अनेक छुप्या गोष्टी बाहेर पडण्यास सुरुवात झाली विशेष म्हणजे माहिती अधिकारामुळे सरकारी यंत्रणेतील अधिकार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
बीड माहितीच्या अधिकारामुळे अनेक छुप्या गोष्टी बाहेर पडण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे माहिती अधिकारामुळे सरकारी यंत्रणेतील अधिकार्यांचे धाबे दणाणले.आहेत त्यामुळे अनेकवेळा योग्य माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत अपिलीय अधिकार्याकडून माहिती न मिळाल्यास, राज्य माहिती आयुक्त कार्यालयांकडे अपिल करणार तसेच राज्यांचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, व तसेच सामाजिक वनीकरण वनमंत्री, यांच्या कडे तक्रार दाखल करणार पांचाळ मात्र माहिती अधिकाराखाली माहिती मागणार्या अर्जदारास 30 दिवसांत देण्यात यावी,तशी कायद्यात तरतूद आहे.माहिती देणं बंधनकारक असुनसुद्धा माहिती देण्यास हे अधिकारी जाणून- बुजून टाळाटाळ करतात शासनाच्या पैशाचा गैरवापर करणार्या अधिकार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, व माहिती न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे करण्यात येईल असा किस्किंदा पांचाळ, यांनी दिला. माहितीच्या अधिकाराखाली त्वरित माहिती मिळेल, असा आशावाद, सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांनी व्यक्त, केला. माहिती अधिकार अस्तित्वात येण्यापूर्वी सरकारी, निमसरकारी व खासगी कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याची ओरड होत असे. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी 2005 मध्ये माहिती अधिकार अस्तित्वात आला. त्यानंतर माहिती अधिकारात भ्रष्टाराची अनेक प्रकरणे उजेडात आली. माहिती अधिकारामुळे भ्रष्टाचार उघडकीस येत असल्याने अनेक अधिका-यांनी माहिती देण्यास टाळाटाळ किंवा विलंब करण्यास सुरुवात केली.संबंधित व्यक्तीने माहिती मागितल्यानंतर एक महिन्यात माहिती उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र काही अधिकारी जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचे अनेक वेळा मला दिसून आले. सुमारे तीन-चार महिने माहिती दिली जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या किस्कींदा पांचाळ यांच्या कडून होऊ लागला. दरम्यान, आशा भ्रष्ट अधिकार्यामुळेच भ्रष्टाचाराला आळा बसणे अशक्य झाले आहे वेळेत माहिती उपलब्ध न झाल्यास संबंधित दिरंगाई करणा-या अधिकार्यांवर कठोर, कारवाई करण्यात यावी, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदा पांचाळ यांनी दिला.
नायगाव मयुर अभरण्यामध्ये दडलय तरी काय?-किस्किंदाताई पांचाळ
मयुर अभयारण्य नायगांव ता.पाटोदा जि. बीड येथील कार्यालय (वन्यजीव) केलेल्या कामांची तसेच माहिती 2012 जून ते 2022 जून पर्यंतच्या केलेल्या कामांची माहिती ही माहितीचा अधिकार कायदा अधिनियम अंतर्गत माहिती देण्यास वनविभाग कार्यालय(असमर्थ असल्याचे जाणवत आहे) टाळाटाळ करत आहे त्यामुळे नायगाव मयुर अभयारण्यामध्ये दडलय तरी काय?असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या किस्किंदाताई पांचाळ यांनी केला आहे.
