चनई येथील बौद्ध समाजातील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला

Beed

चनई येथील बौद्ध समाजातील ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला

आरोपीस तात्काळ अटक करा नसता तीव्र आंदोलन करू - किसन तांगडे

 आष्टी / वार्ताहर 

चनई , तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील बौद्ध ग्रामपंचायत सदस्याच्या हत्याकांडातील आरोपीच्या अटकेसाठी मयताच्या मुलाला सोबत घेऊन किशन तांगडे सह कार्यकर्त्यांनी एस पी नंदकुमार ठाकूर साहेब बीड यांची घेतली भेट .

   सविस्तर माहिती अशी की , बौद्ध समाजातील भीम आर्मी संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ सिताराम घनघाव यांची गावातीलच राशन दुकानदारा सोबत राशन वाटपावरून दसऱ्याच्या दिवशी सकाळी हमरी तुमरी झाली होती , आणि त्याच दिवशी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सतरा ते अठरा जनाच्या टोळक्याने गोरखनाथ घनघाव यांचा तीक्ष्ण हत्याराने भर दिवसा खून केला , अर्थात याच्या पाठीमागे गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची झालर होतीच .

   एकूण सतरा ते अठरा आरोपी पैकी काही आरोपींना अटक झाली असून या नियोजित कटातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी , याकरिता किशन तांगडे यांनी बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब यांची मयताचा मुलगा रामधन गोरखनाथ घनघाव याला सोबत घेऊन भेट घेतली . या दरम्यान एस पी साहेबांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल असे ठोस आश्वासन दिले .

   याप्रसंगी किशन तांगडे सह गावचे सरपंच अनिल शिंदे , मयताचा मुलगा आणि फिर्यादी रामधन घनघाव , युवा नेते सतीश शिंगारे , प्राध्यापक डॉक्टर सिद्धार्थ वाघमारे , युवा नेते विशाल वक्ते , ऍडव्होकेट सुभाष शिंदे , प्राध्यापक फुलचंद लुचारे , मधुकर मोरे , दगडू घनघाव , विजय आदमाने सह आदी कार्यकर्ते या भेटी प्रसंगी उपस्थित होते .

Sharing

Visitor Counter