श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची नियुक्ती लवकरात लवकर करावी-शिवस्वराज्य युवा संघटन महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष किस्कींदा पांचाळ

Beed

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची नियुक्ती लवकरात लवकर करावी-शिवस्वराज्य युवा संघटन महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष किस्कींदा पांचाळ

बीड/वार्ताहर

पंढरपूर येथील महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा कार्यकाल 4जुलै 2022रोजी संपला आहे.त्यानंतर कार्यरत समिती ही मुदतवाढ दिली आहे.त्यामुळे या समितीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.नियमित समिती नसल्याने विठ्ठल-रुक्मीणी दर्शनासाठी येणार्‍या लाखो भाविकास सोई सुविधा पुरवल्या जात नाहीत.देवस्थानचा विकासासाठी ठोस निर्णय घेत नसल्यामुळे मंदिरात सावळा गोंधळ माजला आहे.विकास कामाचा पाठपुरावा केला जात नाही.

काही दिवसांपुर्वी लाडू विक्री केंद्रावर मोजमाफ करणार्‍या अधिका-यांनी धाड टाकल्यावर वजनात कमी लाडू प्रसादाची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले यामुळे प्रशासनाने संबंधित ठेकेदार व संस्थेस 1लाखाचा दंड ठोठावण्यात आला होता.अशा प्रकारे अनेक त्रुटी कारभारात दिसून येत आहेत.असे प्रकार पुन्हा घडू नये तसचे अशा अनेक गोष्टीवर अंकुश ठेवण्यासाठी तातडीने नवीन विठ्ठल-रुक्मीणी मंदिर समिती स्थापन करणे अंत्यत गरजेच आहे.येत्या काळात आपण स्वतःलक्ष घालून श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नेमणूक करावी.आणि पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची नियुक्ती लवकरात लवकर करावी.असे निवदेन बीड जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना दिले आहे.यावेळी निवदेन देताना शिवस्वराज्य युवा संघटन महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षा किस्किंदाताई पांचाळ,सामाजिक कार्यकर्ते वशिष्ठ साबळे,इत्यादी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter