अतिवृष्टीग्रस्त शेतीची व नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

Beed

अतिवृष्टीग्रस्त शेतीची व नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

आष्टी तालुक्यातील विविध शेतकर्‍यांच्या बांधावर 

नुकसान भरपाईसाठी तात्काळ पंचनामे करून तातडीने अहवाल पाठवावे

बीड/वार्ताहर

अतिवृष्टीग्रस्त शेतीची व या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव , सोलेवाडी आदी विविध ठिकाणी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पाहाणी केली. यावेळी शेतकर्‍यांशी भेटून चर्चा केली व दिलासा दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्य़ात यावर्षी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी जिवीत बरोबर घरे, शेतीचे नुकसान, रस्ते, पूल या नुकसानीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मदत देण्यासाठी तात्काळ पंचनामे करून तातडीने अहवाल पाठवावे, अशा सूचना शासकीय यंत्रणेला दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्यात यंदा सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. यात पिकांसह , जनावरांचे , काही ठिकाणी मालमत्तेचे, पोल्ट्रीचे नुकसान झाले आहे. आष्टी तालुक्यातील ब्रम्हगांव येथे भेट दिली, त्यावेळी संवाद साधताना ते बोलत होते. आमदार बाळासाहेब आजबे,उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.

अतिवृष्टीत मातीमोल झालेले सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहिल्यावर बाधित शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करुन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

तुम्ही एकटे नाहीत शासन प्रशासन तुमच्या पाठीशी म्हणत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धीर दिला. मागच्या काही दिवसांपासून तालुक्यात सतत पावसाने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पुराने जमिनी खरडून गेली, गावांचा संपर्क तुटला, वाहतूक ठप्प झाल्याचे त्यांच्या सांगण्यातआलेआहे. यामध्ये शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,

या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी रविवारी दुपारी 12 च्या दरम्यान शेतांच्या बांधावर पोहचले. यावेळी सोयाबीन बरोबर तुर, कापूस या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.

 

तालुक्यातील सोलेवाडी येथे पुरामुळे शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या पोल्ट्रीची व वाहून गेलेल्या पुलाची जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. या परिस्थितीत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

 

 यावेळी सरपंच राहुल काकडे, सरपंच बबन शेकडे, अण्णासाहेब चौधरी, सरपंच सतिश धस, सरपंच राहुल जगताप, सरपंच अशोक पोकळे, संदिप पानसाडे, संतोष सानप,मारुती पवार आदी लोकप्रतिनिधींसह शेतकरी , ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी आ.बाळासाहेब आजबे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सरसकट हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन देऊन मागणी केली. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. असे नमूद केले आहे. 

 

 

 

 

 

Sharing

Visitor Counter