नांदेडच्या ऐतिहासिक धम्म परिषदेचे साक्षीदार व्हावे !!

Beed

नांदेडच्या ऐतिहासिक धम्म परिषदेचे साक्षीदार व्हावे !!

प्रसिद्धी पत्रक : वंचितचे अनिल डोंगरे यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन

बीड/प्रतिनिधी

बौद्ध धम्मीयांच्या 22 प्रतिज्ञावर वैदिक हिंदू संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी गदा आणण्याचे षडयंत्र आखत आहेत. ही धोक्याची घंटा असून आंबेडकरी चळवळींनी वेळीच सावध राहावे. या तथाकथित संघटनांचा हा कुटील डाव हाणून पडण्यासाठी नांदेड येथे भारती बौध्द महासभेकडून 5 नोव्हेंबर रोजी धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. ही धम्म परिषद नांदेड येथील नवा मोंढा मैदान दुपारी १२ वाजता होणार आहे. या ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेला आंबेडकरी समूहाने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी केले आहे.

  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिल्ली येथे मध्यंतरी धम्मदीक्षेचा सोहळा पार पडला.या सोहळ्यात 22 धम्म प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.त्यानंतर वैदिक हिंदू संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी 22 प्रतिज्ञावर बंदी आणावी अशी भूमिका घेतली आहे. सध्या गुजरातच्या निवडणुका होईपर्यंत ही बंदी येणार नाही.परंतु त्यानंतर बंदी येण्याची दाठ श्यक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे भारतीय बौद्ध महासभेकडून बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. या धम्म परिषदे अड.प्रकाश आंबेडकर आंबेडकरी समूहाला संबोधित करणार आहेत.

      धम्म शक्ती हीच खरी शक्ती आहे.या शक्तीच्या जोरावरच आपण 22 प्रतिज्ञावर येणारी बंदी थांबवू शकतो.त्यासाठी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नांदेडला धम्म परिषदेला येण्याचं आवाहन केलं आहे.त्यामुळे सांभाव्य धोके लक्षात घेता आंबेडकरी समूहाने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वंचितचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे यांनी केले आहे.

आंबेडकरी समूहाने गाफील राहू नये!

देशातील आंबेडकरी चळवळ संपवून टाकण्यासाठी काही संघटना कामाला लागलेल्या आहेत. त्या संघटनांचा कुटील डाव आता खरोखरच ओळखला पाहिजे. म्हणून गाफील राहून चालणार नाही.सध्या देशात केवळ आणि केवळ एकाधिकार शाही सुरु आहे. या एकाधिकार शाहीला मानवी मूल्यांचे काहीही देणेघेणे नाही. त्यांना अस्थिरता निर्माण करुन विषमतावाद पसरवायचा आहे. त्यामुळे आंबेडकरी समूहाने सावध राहणे गरजेचे आहे.

 

Sharing

Visitor Counter