पत्रकार महादेव गित्ते यांना सावित्रीज्योती पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबदल वैद्यनाथ महाविद्यालयात सत्कार

पत्रकार महादेव गित्ते यांना सावित्रीज्योती पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबदल वैद्यनाथ महाविद्यालयात सत्कार
परळी/प्रतिनिधी
शहरातील पत्रकार महादेव गित्ते यांना सावित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल वैद्यनाथ महाविद्यालयात पत्रकार महादेव गित्ते यांचा प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
शहरातील जवहार शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ महाविद्यालय येथे सोमवार दि. 7 नोव्हेंबर रोजी पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा सावित्रीज्योती राज्यस्तरीय पुरस्कार महादेव गित्ते (पत्रकार) यांना मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. समाज जागृती करण्याचे साधन म्हणजे पत्रकारिता समाजातील अन्याय ,अत्याचार व सामाजिक अंधश्रद्धा , रूढी -परंपरा याविरुद्ध लढा देण्याचे काम वृत्तपत्र करीत असते. म्हणूनच पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी याप्रसंगी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. पी. एल. कराड, प्रा. हरिष मुंडे , डॉ रमेश राठोड, डॉ बी व्ही केंद्रे, डॉ व्हि जे चव्हान,,डॉ टी ए गित्ते, प्रा यू आर कांदे,डॉ विश्वनाथ फड प्रा. बाबासाहेब शेप यांच्यासह पत्रकार अनिरुद्ध जोशी, मोहन व्हावळे, प्रा. प्रवीण फुटके, संतोष जुजगर, बालाजी जगतकर, प्रा.दशरथ रोडे सर, कैलास डुमणे, श्रीराम लांडगे, बालासाहेब फड, अभिमान मस्के, पद्माकर मुजमुले, निवृत्तीआप्पा, बालाजी ढगे, रावसाहेब जगतकर व इतर उपस्थित होते. यावेळी या कार्यक्रमचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ.बाबासाहेब शेप यांनी मानले.
वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिसरात पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण
शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिसरात परळीतील पत्रकार बांधवांच्या हस्ते विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.व्ही.मेश्राम व पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी वृक्षारोपण जतन व पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली.