शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह काेश्यारीची हक़ालपट्टी करा-ॲड. प्रा. इलियास इनामदार

शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या भगतसिंह काेश्यारीची हक़ालपट्टी करा-ॲड. प्रा. इलियास इनामदार
बीड/प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्द्ल बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी व चंद्रकांत पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य केल्या प्रकरणी लोकसेना संघटना जाहिर निषेध करत असून देशाचे राष्ट्रपती यांनी भगतसिंह कोश्यारी यांची हक़ालपट्टी करावी व पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीसह श्रीपाद छीदंम, विनोद तावड़े, मंगल प्रभात लोढ़ा, देवेंद्र फडणवीस जयभगवान गोयल व चंद्रकांत पाटील या भाजपा नेत्यांवर पक्षातुन निलंबित करुन कड़क कार्यवाही करावी अशी मागणी लोकसेना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार यांनी केलेली आहे राज्यपालांच्या व भाजपा नेत्यांच्या अशा बेजबाबदार वागण्यामुळे आणि बेताल बोलण्यामुळे राज्यात संताप व्यक्त होत आहे आणि अशा बेजबाबदार व्यक्तिला महाराष्ट्राच्या राज्यपालपदी व इतरांना राजकारणात राहण्याचा अधिकार नाही म्हणून राष्ट्रपती व पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी सोबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीसह सम्बंधित भाजपा नेत्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी जेणे करुन दूसरे कोणीही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज व कोणतेही राष्ट्रपुरुष असो यांचा अवमान- अपमान करण्याची हिम्मत करणार नाही अशी मागणी ईमेलद्वारे देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेन्द मोदी यांना लोकसेना संघटनेच्या वतीने केली आहे. सोबत वरील नेत्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी सोमवारी शिवप्रेमी यांच्या वतीने ठेवण्यात अालेल्या बीड बंद मध्ये जिल्ह्यातील सर्व व्यापारी शाळा महाविद्यालये बंद ठेवून शांतता मार्च मध्ये सामिल व्हावे लोकसेना पाठिंबा जाहिर करत आहे असे आव्हान लोकसेना संघटना प्रमुख ॲड. प्रा. इलियास इनामदार, खैसर बेग, सुफियान मणियार, ॲड.कलीम काज़ी, मौलाना ज़फर काज़ी, गुलाम साकिब, मिर्ज़ा नदीम बेग,अयाज़ अखतर, शेख समीर, रज़ी भैय्या शेख अफ्फान अकबर अतार, सालेम भैय्या यांनी केले आहे.








